वडूज: चालू वर्षी खटाव-माण या कायमस्वरुपी दुष्काळी तालुक्यात पिण्याच्या पाण्याची भयंकर टंचाई जाणवत आहे. लोकांना आता पाण्याचे महत्व चांगलेच समजले आहे. त्यामुळे वॉटरकप स्पर्धेत गावोच्या गावे सहभागी होत आहेत. या निमित्ताने सहभागी गावातील लोकांमे सक्रीयता वाढविण्यासाठी पाणी फाउंडेशनच्या माधयमातून वेेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. नुकतीच माण तालुक्यातील गोंदवले खुर्द येथे ग्रामस्थांची महाग्रामसभा संपन्न झाली. या ग्रामसभेत पाणी फौडेशनचे समन्वयक डॉ. अविनाश पोळ, तसेच वर्हाडी विनोदी अभिनेते भारत गणेशपुरे यांनी पाणी बचतीचे महत्व लोकांना पटवून सांगितले. या निमित्ताने पाणी फौंडेशनच्या मैदानात अभिनेते गणेशपुरेंची चांगलीच हवा निर्माण झाली.
पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून वॉटर कप 2019 च्या निमित्ताने येणार्या 45 दिवसांच्या मध्ये करण्यात येणार्या कामांच्या नियोजनासाठी गोंदवले खुर्द मध्ये मारुती मंदिरा समोर गावाची महा ग्रामसभा आयोजित केली होती,या सभेला गावातून सुमारे दीड हजार मुले मुली महिला पुरुष जमा झाले होते.या सभेला विशेष मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र समन्वयक डॉ अविनाश पोळ, चला हवा येऊ द्या मालिकेतील कलाकार भारत गणेशपुरे, मंत्रालयातील उपसचिव डॉ नामदेव भोसले, बाळासो शिंदे,अजित पवार,यांच्यासह गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी,संचालक,ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, शिक्षक, आरोग्य कर्मचारी,सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी डॉ पोळ आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की या काळ्या आईने आपल्याला खूप भरभरून दिले असून तिची तहान भागवणे सुध्दा आपलं कर्तव्य आहे. आज थर्टी फस, व्हॅलेंटाईन डे अशी नवनवीन फॅड निघाली असून यांच्या माध्यमातून आपली भावी पिढी व्यसनी होऊ लागली आहे म्हणून मी 2004 साली माझ्या गावच्या परिसरात असणार्या सुमारे 67 गावातील युवकांना एकत्र करून अशा महत्वाच्या दिवशी गावातील मंदिरे रस्ते धुवून काढणे अशी शक्य असणारी कामे करायाला सुरुवात केली. त्यानंतर निश्चय करून अजिंक्यतारा किल्ल्यावर श्रमदान सुरू केलं यामुळे किल्ला स्वच्छ झाला किल्ल्यावर पाणी आडल आणि श्रमदान करणार्या लोकांच्या शरीराची चांगल्या प्रकारे निगा राखली गेली मी स्वतः 365 दिवस श्रमदान केलेला माणूस आहे आपण श्रमदानातून खूप काही मिळवू शकतो आपण मन आणि शरीर सुदृढ राहत आहे.पाणी फाउंडेशन काय पैसे घेऊन आले नाही.
पाणी फाउंडेशन ज्ञान घेऊन आल आहे कारण पैसे चिरंतन टिकत नाही म्हणून ज्ञान महत्वाचे आहे.माणूस एकत्र आल्यावर सगळं शक्य असतं महाराष्ट्रात अनेक संत जन्माला आले त्यांचं कर्तृत्व खूप मोठं असून म्हणून आज ही आपण त्यांचं आपण स्मरण करतो. सगळ्यांनी एकत्र राहा याच शुभेच्छा आहेत. यानंतर नामदेव भोसले बाळासो शिंदे यांनी आपली मनोगते व्यक्त केली
पाणी फौंडेशनच्या मैदानातही भारत गणेशपुरेंची हवा
RELATED ARTICLES

