पाटण:- कोयना विभागातील नाव येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा संसयीत आरोपी नराधम संतोष विचारे याला ताबडतोब अटक करून जास्तीत जास्त शिक्षा करावी अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा पाटण तालुका यांचे वतीने तहसिलदार व पोलिस निरीक्षक पाटण यांना निवेदन देताना केली आहे. कोयनानगर विभागातील सखल मराठा समाजाने उद्या रविवारी कोयनानगर बंदची हाक दिली आहे.
निवेदन देताना मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे की कोयना विभागातील नाव गावातील एक अल्पवयीन मुलगी शिक्षणासाठी गावातीलच नातेवाईक पाटण (रामपूर) येथे राहणाऱ्या संतोष विचारे नामक व्यक्तीकडे राहत होती. अल्पवयीन मुलीच्या असाह्यतेचा गैरफायदा घेऊन पोलिस पाटील पदावर कायद्याचा रक्षक असलेल्या या नराधमाने या मुलीवर अत्याचार केला. हि समाजामध्ये चीड आणणारी घटना आहे. संबंधित आरोपी अजूनही मोकाट फिरत आहे. यापूर्वी या व्यक्तीकडून अशा प्रकारचे महिलांच्या छेडछाडीचे प्रकार अनेक वेळा घडले आहेत. या बाबतीत त्याने लोकांचा अनेकवेळा चोपही खाला आहे. त्याची ही विक्रुतीच असून या घटनेचा पाटण तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत असून या नराधमास पाठीशी न घालता ताबडतोब अटक करावी व जास्तीत जास्त शिक्षा द्यावी. तसेच सदर अत्याचारग्रस्त कुटुंबास शासनाकडून ताबडतोब मदत देण्यात यावी. व सदर आरोपीस पोलीस पाटील पदावरून तात्काळ निलंबित करावे असे मागणी केली आहे.
यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे यशवंतराव जगताप, राजाभाऊ काळे, बकाजीराव निकम, मंगेश पाटणकर, नितीन सत्रे, सुभाषराव शिर्के, विक्रम यादव, लक्ष्मण चव्हाण, दिनकरराव माथने सर, रवींद्र पाटील, निलेश सांळुखे, संजय विचारे, नारायण विचारे यांच्यासह समस्त मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने उद्या कोयनानगर बंदची हाक देण्यात आली आहे.