Tuesday, June 24, 2025
Homeठळक घडामोडीपाटण परिसरात वादळी वाऱ्यासह वळीवाच्या पाऊसाचे आगमन ; रामनवमीत यात्रेकरूंची तारांबळा.

पाटण परिसरात वादळी वाऱ्यासह वळीवाच्या पाऊसाचे आगमन ; रामनवमीत यात्रेकरूंची तारांबळा.

पाटण:- पाटण शहरासह तालुक्याच्या कोयना, मोरगिरी, चाफळ केरा मणदुरे, ढेबेवाडी, तारळे, मल्हारपेठसह सर्वच विभागात शनिवारी ढगाच्या कडकडासह विजेच्या लखलखाट करत वादळी वाऱ्यासह गारांचा वळीव पावसाच्या सरी पडल्या उखाड्याने हैराण झालेल्या नागरीकानां या पाऊसाने गारवा मिळाला. तर वळीवाच्या पहील्याच पावसात बाल गोपाळांनी नाचत गारा गोळा करण्याचा आनंद घेतला. पाटण येथे रामनवमी निमित्त भरलेल्या यात्रेत या पाऊसाने यात्रेकरूंची व यात्रेतील दुकानदारांची तारांबळ उडाली.

पाटण शहरासह तालुक्याच्या विविध भागात गेले पधंरा दीवसा पासुन उनाची तिव्रता वाढली होती. त्यामुळे उखाडा चागंलाच जानवु लागला होता.
मात्र शनिवारी सकाळ पासुनच आभाळ गच्च होते उन्हाचे तापमान कमी झाले होते. दुपारी वादळी वाऱ्यासह ढगाच्या कडकडाट व विजेचा लखलखाटासह गांराचा पावसाने दमदार हजेरी लावली. पावसाची रिपरिप सुरू होती. पावसाने तालुक्यात दमदार हजेरी लावल्याने शेतकरी राजा सुखावला आहे. दरम्यान, शनिवारी रामनवमी असल्याने चाफळ व पाटण येथे रामाच्या यात्रेत आलेल्या भाविकांची व मिठाई .विविध खेळणी यात्रेतील पाळणे दुकांदाराची चागलीच धावपळ झाली. तारळे येथे आठवडा बाजार असल्याने बाजारपेठेत खरेदी-विक्रीसाठी आलेल्या लोकांची चांगलीच दैना उडाली होती. दिवसभर पडत असलेल्या पावसामुळे हवेत चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. वादळी वाऱ्यामुळे व गारांच्या माऱ्याने आब्यांच्या फळांचे मोठे नुकसान झाले आहे.

बळीराजाला प्रतिक्षा असलेल्या मान्सूनच्या पावसाने. शेतकरी सुखावला असला तरी शेतीच्या मशागती इतक्यात सुरू होणार नाहीत. असे शेतकऱ्यांनी सांगितले. पाटण नवीन बसस्थानक परिसरात पाण्याचे तळे निर्माण झाले होते. एकंदरीत पावसाच्या आगमनामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. बाळगोपाळांनी देखील या पहिल्या पाऊसाचा मनमुराद आनंद घेतला.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular