Thursday, June 19, 2025
Homeठळक घडामोडीभिमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पाटण मध्ये बंद व निषेध मोर्चा ; ...

भिमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ पाटण मध्ये बंद व निषेध मोर्चा ; हल्लेखोरांवर कारवाईच्या मागणीचे तहसीलदारांना निवेदन

पाटण/ प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यातील भिमाकोरेगाव येथील विजय स्तंभाला दरवर्षी प्रमाणे १ जानेवारी रोजी अभिवादन करण्यासाठी गेलेल्या भिम अनुयायांच्यावर काही समाज कंटकांनी बेछूट दगडफेक करून मारहाण करत वाहनांची जाळपोळ करून दंगल माजवली, या घटनेच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकर यांनी दि.३ रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते, त्यानुसार पाटण मध्ये या घटनेच्या निषेधार्थ विविध बहुजन संघटना व पक्षांच्या वतीने पाटण शहरात मध्ये निषेध मोर्चा काढून तहसीलदारांना समाजकंटकांवर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन देण्यात आले, या वेळी रिपाइं, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा,भारिप,युथ रिपब्लिकन, या पक्षांसह भीमशक्ती,बी.आर.एस.पी, स्वाभिमानी शेतकरी संघटना,भारतीय बौद्ध महासभा, पाटण तालुका ओबीसी संघटना, लहुजी शक्ती सेना, नाभिक सेना, माळी महासंघ यांच्या सह अनेक संघटनांनी या निषेध मोर्चात सक्रिय सहभाग घेऊन पाठिंबा दर्शविला .
दरम्यान सकाळी पाटण शहरातील डाॅ बाबासाहेब आंबेडकर स्मारका पासुन निषेध मोर्चास सुरवात होऊन झेंडा चौक मार्गे डाॅ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय या घोषणा देत हा मोर्चा पाटण तहसिल कार्यालयावर धडकला, यावेळी तहसीलदार रामहरी भोसले यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात भिमाकोरेगाव या ठिकाणी दंगल घडविणाऱ्या सुत्रधारांवर महाराष्ट्र शासनाने कडक कारवाई करून त्यांचे विरूद्ध दंगल घडविणे, हत्या करणे, व आॅट्रासिटीच्या सुधारित कलमान्वये कारवाई करण्याची मागणी केली आहे, यावेळी झालेल्या निषेध सभेत युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी भिमाकोरेगाव च्या घटनेचा निषेध करत पाटण तालुक्यातील सर्व बहुजन समाजाने संयम राखून एकोप्याने रहावे अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन केले, या वेळी रिपाइंचे तालुकाध्यक्ष प्राणलाल माने, विजय थोरवडे यांनी मनोगत व्यक्त केले, यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजाभाऊ काळे, रिपाइचे रवींद्र सोनावले,ओबीसी संघटनेचे बबनराव सुतार, प्रकाश सुतार, नाभिक संघटनेचे तालुकाध्यक्ष अधिकराव चव्हाण,भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष मिलिंद कांबळे, जि. प. सदस्य बापुराव जाधव, पं.स सदस्य बबनराव कांबळे,ऊज्वला लोहार, नगरसेवक सचिन कुंभार, अनिता देवकांत, शेतकरी संघटनेचे विकास हादवे, भारिपचे सर्जेराव सावंत,अशोकराव देवकांत, अनिल माने, विक्रांत कांबळे, द यानंद शिलवंत, राजाभाऊ जाधव, कृष्णत पुजारी, संजय डूबल, संजय कांबळे, यांच्यासह अनेक संघटनेच्या प्रमुखांची उपस्थिती होती,
दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ तालुक्यातील पाटण शहर, कोयनानगर, मोरगीरी, नवारस्ता,मल्हारपेठ,ढेबेवाडी, तारळे या ठिकाणी व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवून सहभाग घेतला, तर पाटण एसटी आगारानेही दिवसभर वाहतूक बंद केली होती. पाटण
तालुक्यातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळून भिमाकोरेगाव च्या घटनेचा निषेध केला आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular