Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीपाटण ते मुरुड थेट एस. टी. सेवा सुरू करावी : युवा सेनेची...

पाटण ते मुरुड थेट एस. टी. सेवा सुरू करावी : युवा सेनेची मागणी

पाटण : पाटण तालुक्यातील डोंगर-दुर्गम व जंगली भाग ओळखला जाणारा मरड या ठिकाणी एस. टी. सेवा सुरू असती तर येथील हणमंत मिसाळ या शेतकर्‍यांला अस्वलाच्या हल्यात जखमी व्हावे लागले नसते. भविष्यातील जंगली प्राण्यापासुन होणारे हल्ले. टाळण्यासाठी या दुर्गम भागात पाटण ते मुरुड हि थेट एस. टी. सेवा सुरू करण्याची मागणी निवेदनाव्दारे पाटण तालुका युवा सेनेच्या वतिने पाटण एस. टी. आगार प्रमुखांना करण्यात आली.
पाटण तालुक्यातील डोंगर- दुर्गम भागातील वनकुसवडे परिसरात मुरुड या ठिकाणी हणमंत मिसाळ या शेतकर्‍यांवर अस्वलाने हल्ला करून गंभीर जखमी केले. हणमंत मिसाळ हे पाटण वरून बाजार करून भिकाडी मार्गे जंगलातील पायवाटेने घरी मरड या ठिकाणी चालले होते. यावेळी त्यांच्यावर जंगलातील अस्वलाने जिवघेणा हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले. या गावाला थेट एस. टी. सेवा सुरू  असती तर हणमंत मिसाळ हे अस्वलाच्या हल्यातुन बचावले असते. या मार्गावर काटीटेक, वनकुसवडे, मरड या गावांना जोडून रामेल, बामनेवाडी, जिमाणवाडी, जांभे, भिकाडी, मिसाळवाडी, धनगरवाडा, हि गावे आहेत. येथील शेतकरी नागरीकांना व त्यांच्या विद्यार्थी मुलांना दैनदिन व्यवहार  साठी पाटण या ठिकाणी यावे लागते. या नागरीकांना पाटण ते वनकुसवडे, इथ पर्यंतच एस.टी.सेवा सुरू आहे. येथून पुढे नागरीक व विद्यार्थ्यांना आपआपल्या गावी व घरी पायी चालत जावे लागते. हा डोंगर – दुर्गम, जंगली भाग असल्याने या भागात बिबट्या, अस्वले, गव्वा रेडे, डुक्कर आदी जंगली प्राण्यांचा वावर आहे. अशावेळी येथील नागरीकांना आपला जिव मुठीत घेउन पायी प्रवास करावा लागतो. हणमंत मिसाळ यांच्यावर अस्वलाकडून झालेल्या हल्यामुळे येथील परिसरात भितीचे वातावरण आहे. या नागरीकांचा दैनदिन व्यवहार प्रवास सुरक्षित होण्यासाठी पाटण ते मरड व परिसरातील गावा पर्यंत थेट एस. टी. सेवा तात्काळ  सुरू करावी. अशी मागणी युवा सेना पाटण तालुक्याच्या वतिने करण्यात आली आहे. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाव्दारे पाटण एस. टी. आगार प्रमुखांना देण्यात आला आहे. यावेळी शिवसेना युवा सेनेचे तालुका अध्यक्ष ओंमकार भस्मे. शिवसेना पाटण शहर प्रमुख शंकरराव कुंभार, उप शहर प्रमुख महादेव खैरमोडे, नाना पवार, सुर्यकांत टोळे, अमर जगम, आदी कार्यकर्ते उपस्थित होती.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular