म्हसवड ः माण तालुका मराठी पत्रकार संघाच्या निवडी जाहीर झाल्या. या निवडीमध्ये माण तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सागर बाबर तर उपाध्यक्ष पदी धनंजय पानसांडे व जयराम शिंदे यांची बिनविरोध करण्यात आली .
दि .20 रोजी माण तालुका मराठी पत्रकार संघाची बैठक आयोजित करण्यात आली होती.हि बैठक माण तालुका मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष सिद्धार्थ भाऊ सरतापे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली . यावेळी नवीन पदाधिकार्यांच्या निवडी बिनविरोध जाहीर करण्यात आल्या .
माण मराठी पत्रकार संघाची बैठक नुकतीच शासकीय विश्रामगृह म्हसवड येथे पार पडण्यात आली. यावेळी माण मराठी पत्रकार संघाच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. सर्वानुमते माण तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सागर बाबर व उपाध्यक्ष पदी धनंजय पानसांडे व जयराम शिंदे यांच्या बिनविरोध निवडी करण्यात आल्या. माण तालुक्यातील पत्रकार हे दुष्काळाच्या बातम्या सातत्याने वार्तांकन करत असतात ..पत्रकाराच्या न्याय हक्कासाठी आम्ही एकत्र येऊन काम करणार आहे.पत्रकारांना योग्य मानधन मिळण्यासाठी पत्रकारांचा एकत्रित लढा उभाणार आहे असे मत माण तालुका मराठी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष पोपटराव बनसोडे यांनी केले.
यावेळी पत्रकार संघाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली .यावेळी अध्यक्ष सागर बाबर ,उपाध्यक्ष धनंजय पानसांडे,जयराम शिंदे सचिव विशाल माने ,खजिनदार सुशील त्रिगुणे जिल्हाप्रतिनिधी विजय भागवत, कार्यध्यक्ष अजित काटकर आदीच्या निवडी जाहिर करण्यात आली.यावेळी माजी.अध्यक्ष सिद्धार्थभाऊ सरतापे , जिल्हा प्रतिनिधी विजय भागवत, कार्याध्यक्ष अजित काटकर ,जेष्ठ पत्रकार विजय टाकणे आकाश दडस ,विजय ढालपे ,राजू केवटे,योगेश गायकवाड,अहमद मुल्ला,आबासो पुकळे, दिलीप किर्तने,राजेश इनामदार ,शिवशंकर डमकले ,अशोक हांडे ,आबासो राजगे हे माण तालुका पत्रकार सभासद उपस्थित होते. यावेळी अध्यक्ष सागर बाबर म्हणाले कि हि संघटना जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत राहणार असून ग्रामीण भागातील मराठी पत्रकार यांच्या न्याय हक्कासाठी कार्यरत राहणार आहे .
तसेच माण तालुका मराठी पत्रकार संघाचे सचिव विशाल माने म्हणाले कि सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी व परिसरातील अन्याय ग्रस्त नागरिकांसाठी पत्रकारितेच्या माध्यमातुन प्रशासन दरबारी आवाज उठवण्याचे काम करणार असून सर्व सर्वसामान्यांच्या अडीअडचणीसाठी सदैव माण तालुका मराठी पत्रकार संघ सदैव तत्पर असल्याची ग्वाही त्यांनी दिली. माण मराठी पत्रकार संघाच्या नूतन पदाधिकार्यांचे विधानपरिषदेचे सभापती ना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर , मंत्री ना. विजयबापू शिवतारे, सहपालक मंत्री सदाभाऊ खोत , पशुसंवर्धन व दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर , जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर माण खटावचे आमदार जयकुमार गोरे, माजी कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख , जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे, दै ऐक्यचे देवेंद्र पळणीटकर,शैलेंद्र पळणीटकर ,बापूसाहेब जाधव,तानाजी पाटील,शरद काटकर दीपक प्रभावळकर , सचिन जवळकोटे, विनोद कुलकर्णी, दैनिक सत्यसह्याद्रिचे संदीप कुलकर्णी ,माजी आमदार डॉ दिलीप येळगावकर, भाजप चे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई , शेखर गोरे , माणदेशी बँक संस्थापक अध्यक्षा चेतना सिन्हा, विजय सिन्हा, जि प सदस्या डॉ भारती पोळ, सुवर्णा देसाई , उपसभापती नितीन राजगे, सभापती रमेश पाटोळे प्रा.विश्वंभर बाबर, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे जिल्हा पोलीस प्रमुख पंकज देशमुख उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल वडनेरे ,माण तहसीलदार बी एस माने गटविकास अधिकारी जी . डी शेलार म्हसवड चे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री मालोजीराव देशमुख पोलीस उपनिरीक्षक शहाजी गोसावी म्हसवड नगरपरिषद मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी अभिनंदन केले.
माण तालुका पत्रकार संघ नवीन कार्यकारिणी निवडी जाहीर
RELATED ARTICLES