वडूज : वडूज ता खटाव येथील निसळबेंद वस्तीवरील पाझर तलावाच्या दुरुस्तीचे काम निकृष्ट व अर्धवट सोडले असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांनी केला आहे. तर लवकरात लवकर काम चांगल्या प्रकारे करावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे निवेदन ग्रामस्थांनी दिले आहे.
याबाबत त्यांनी दिलेल्या निवेदनातील अधिक माहिती अशी, गेल्या तीन ते साडे तीन महिन्यांपूर्वी निसळबेंद येथील पाझर तलाव दुरुस्ती करण्याचे काम एका ठेकेदाराने घेतले असून. गेल्या दोन ते अडीज महिन्यांपासून हे काम बंद स्थितीत आहे. याबाबत ग्रामस्थांनी लघु पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांना वारंवार भेटून तोंडी तक्रारी केल्या आहेत. मात्र अधिकारी या ठिकाणी येऊन समबंधित ठेकेदाराला सूचना देऊन निघून जात असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे. विशेषतः या पाझर तलावाची डागडुजी गेल्या अनेक वर्षांपासून दोन ते तीन वेळा करण्यात आली आहे. या तलावात जास्त दिवस पाणी साठा राहत नसल्याने पुन्हा या तलावाची दुरुस्ती करण्याचं काम सुरू करण्यात आले होते. मात्र या तलावाची उंची ही ठेकेदाराने कमी केली असून त्या कामावर वापरण्यात आलेला कागद ही पूर्ण वापरला नसल्याचा आरोप ही ग्रामस्थ करीत आहेत.याबाबत वरिष्ठ अधिकार्यांनी समबंधित कामाची तपासणी करावी व हे काम ठेकेदाराला चांगल्या पद्धतीने करण्यास सांगावे अन्यथा आम्ही सर्व ग्रामस्थ तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे ही त्यांनी निवेदनात म्हटले आहे. तर सध्या बंद स्थितीत असलेल्या या पाझर तलावाचे काम हे पावसाळ्या पूर्वी करणे गरजेचे असून या ठिकाणी पिचिंगचे काम सध्या अर्धवट स्थितीत आहे. अन्यथा झालेल्या कामाचे पूर्ण नुकसान होणार असल्याचे मत ही ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे.
पाझर तलावाचे काम निकृष्ट झाल्याने ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात
RELATED ARTICLES