(अजित जगताप)
पुणे दि: सातारा जिल्ह्यातील अन्याय विरोधात पेटून उठणारा बुलंद आवाज व आंबेडकरी चळवळीचा वारसा लाभलेले उद्योजक रमेश अनिल उबाळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्याग करून आदरणीय रिपब्लिकन नेते जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वाखाली पीपल्स रिपब्लिकन पक्षामध्ये काम करण्याचा निर्णय घेतला. यामुळे पश्चिम महाराष्ट्रात पीपल्स रिपब्लिकन पक्षाची ताकद वाढल्याची चिन्ह दिसू लागलेले आहे.
सातारा जिल्ह्यातील मूळचे ल्हासुर्णे तालुका कोरेगाव येथील सुपुत्र असलेल्या रमेश अनिल उबाळे यांनी बांधकाम व्यवसायामध्ये खूप मोठी मजल मारलेली आहे. आंबेडकरी चळवळीचे बाळकडू मिळालेल्या रमेश उबाळे यांनी आपली गुणवत्ता सिद्ध करून दाखवलेले आहे. एवढेच नव्हे तर अन्याय करणारा पेक्षा अन्याय सहन करणारा दोषी असतो .या वाक्याची बांधिलकी मानून त्यांनी स्वतःचे अस्तित्व निर्माण केले.
सातारा जिल्ह्यातील विशेषता कोरेगाव- फलटण या भागात गोरगरीब, कष्टकरी,शेतमजूर दलित, पद- दलित, अल्पसंख्यांक व आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या कोणत्याही व्यक्तीने कधीही अन्याय सहन करू नये. यासाठी त्यांनी कोणत्याही परिणामाचा विचार न करता सामान्य माणसाला न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे .
ज्या राजकीय पक्षांमध्ये ते प्रवेश करतात. त्या पक्षाचे विचारधारा व पक्ष वाढीसाठी त्यांनी प्रामाणिकपणाने प्रयत्न केल्यामुळेच कोरेगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये परिवर्तनाची नांदी पाहण्यास मिळाली. सामान्य समूहाचा प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी उपोषण, रास्ता रोको, धरणे आंदोलन करून प्रशासनाला जाग आणलेली आहे. भीम नगरच्या जागेचा प्रश्न असो अथवा वैद्यकीय क्षेत्रातील घडामोडी तसेच बांधकाम व्यवसायामध्ये अधिकाऱ्यांकडून झालेला अन्याय मिटवण्यासाठी स्वतः रमेश उबाळे हे वस्तुनिष्ठ माहितीच्या आधारे आंदोलन करत असल्याने अनेक भ्रष्टाचार त्यांनी उघडकीस आणलेली आहे. त्यामुळे तोड पाणी न करणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख झालेली आहे.
या ओळखीचा फायदा पीपल्स रिपब्लिकन पक्षाची वाटचाल करण्यास उपयुक्त ठरणार आहे. असे अनेक जण मानू लागलेले आहेत. दरम्यान युवा नेते रमेश अनिल उबाळे यांची पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झालेले आहे. या निवडीमुळे खऱ्या अर्थाने पॅंथरस चळवळीतील तारणहार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर, युवा नेते जयदीप कवाडे व पल्स रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी नंदकुमार गोंधळी, मृणाल गोस्वामी, राजाभाऊ चव्हाण, कपिल लिंगायत व सातारा जिल्हा अध्यक्ष युवराज कांबळे यांच्या मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिलेले आहेत.
——————————————-
फोटो:- पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी रमेश उबाळे यांची निवड करताना नेतेगण मंडळी (छाया- अजित जगताप, पुणे)