फलटण : गोखळी, खटकेवस्ती, गुणवरे, ता. फलटण येथील ग्रामदैवतांच्या मुर्तीना प्रथेप्रमाणे सोमवती अमावस्या निमित्ताने निरा नदी पात्रात गंगास्नास घालण्यात आले. दीपावली पाडवा आणि सोमवती अमावस्या एकञित आल्याने या गंगा स्नानास वेगळे महत्व प्राप्त झाले होते.
गुणवरे येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ, खटकेवस्ती येथील श्री तुळजा भवानी देवी, गोखळी येथील श्री खंडोबा, श्री तुळजा भवानी देवी आणि ग्रामदैवत श्री दक्षिण मुखी हनुमान या दैवतांच्या मूर्ती पालख्यामधून पारंपरिक वाद्यांच्या निनादात निरा नदी काठावरील खंडोबा मंदिर येथे आणण्यात आल्या. गेल्या अनेक वर्षांपासून प्रत्येक सोमवती अमावस्या दिवशी अखंडीतपणे ही परंपरा सुरु आहे. गुणवरे येथील भाविक 5/6 कि.मी. अंतर पार करुन येत असतात येथे गंगा स्नान घालण्यात येते. गंगा स्नानानंतर खंडोबा मंदिरासमोर सर्व ग्रामदैवतांची वाद्यांच्या साथीने ग्रामदैवतांचे पुजारी यांनी सामुहिक आरती केली, प्रसाद वाटप करण्यात आले. आरती नंतर सर्व पालख्या ढोल, ताशा, सनई, डफच्या निनादत ग्रामप्रदक्षिणा घालून आपापल्या मंदिरात पोहचल्या मिरवणुक मार्गावर ठिकठिकाणी नागरीकांनी दर्शन घेतले.
फलटण ग्रामदैवतांच्या मुर्तीना सोमवती अमावस्यानिमित्त गंगास्थान
RELATED ARTICLES