फलटण प्रतिनिधी – फलटण शहर व ग्रामीण पोलीस स्टेशनसह अण्य जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये दरोडा, घरफोडी, जबरी चोरी, बलात्कार या सारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या निंभोरे ता. फलटण येथील टोळी प्रमुख धर्म्या उर्फ नकट्या तुक्या शिंदे याच्यासह अण्य चार जणांच्या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत फलटण शहर पोलीस स्टेशनने प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
सालपे ता . फलटण येथे एका वृध्द महिलेचा पहाटे अज्ञात चोरटयांनी दरोडा टाकून रवून करून तिचे गळ्यातील सोन्याचे दागिने चोरून नेले होते. त्याबाबत लोणंद पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयाचा तपास करत असताना आरोपी रोहित ऊर्फ टक्या चिवळ्या पवार वय १९ वर्ष रा. चौधरवाडी ता. फलटण जि. सातारा निष्पन्न झाला. त्यास सदर गुन्यात अटक करून तपास केला असता, त्याने सदरचा गुन्हा विशाल ऊर्फ मुक्या भिमराव पवार रा . बहाद्दरवाडी ता. वाळवा जि. सांगली, बाप्या कल्याण ऊर्फ परश्या शिंदे रा. खंडाळा ता. खंडाळा जि. सातारा, चाँद उर्फ सुरज जेल्या ऊर्फ जालींदर पवार रा. बडेखान ता. फलटण जि. सातारा व धर्म्या ऊर्फ नकट्या तुक्या शिंदे रा. निंभोरे ता. फलटण जि. सातारा यांचेसह केले असलेचे निष्पन्न झाले आहे. सदर आरोपी यांचा पुर्व इतिहास पडताळून पाहिला असता त्यांचेवर लोणंद, फलटण शहर, फलटण ग्रामीण, कोडोली जि. कोल्हापुर व वडगाव निंबाळकर जि. पुणे या पोलीस ठाण्यामध्ये दरोडा, बलात्कार, जबरी चोरी, घरफोडी तसेच दरोड्यासह खून या प्रकारचे एकुण १३ गुन्हे दाखल आहेत. सदरचे गुन्हे हे आरोपी धम्र्या ऊर्फ नकटया तुक्या शिंदे रा. निंभोरे ता. फलटण जि. सातारा ( टोळी प्रमुख ) याने वरील आरोपींची संघटीत टोळी तयार करून समाजात दहशत निर्माण करण्यासाठी सदरचे गुन्हे केलेचे निष्पन्न झाल्याने लोणंद पोलीस ठाणेचे सपोनि गिरीश दिघावकर यांनी सदर गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायदा सन १९९९ चे कलग ३ ( १ ) ( एक ) ( दोन ) . ३ ( २ ) . ३ ( ४ ) या कलमांचा अंतर्भाव होणे कामीचा प्रस्ताव पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील यांचेवतीने विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापुर यांचेकडे पाठविण्यात आला होता त्यास त्यांनी मंजुरी दिली आहे. फलटण विभागामध्ये यासह मोक्का अंतर्गत करण्यात आलेल्या कारवाईंची संख्या आता चार झाली आहे. तसेच आगामी लोकसभा निवडणुक अनुषंगाने २ पेक्षा जास्त गुन्हे दाखल असणार्या पन्नास जणांवर तडीपारीची कारवाई सुरू केलेली आहे.
धर्म्या ऊर्फ नकट्या तुक्या शिंदे टोळीवर मोकांतर्गत कारवाई
RELATED ARTICLES