फलटण: फलटण शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या लक्ष्मीनगर भागात दागिन्यांना पोलिश करण्याच्या बहाण्याने एका वृद्ध महिलेचे दागिने लंपास केले असल्याची घटना घडली असून चोरटे सिससीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहेत.
फलटण शहर पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, श्रीमती मनोरमा भगवानराव जाधव वय 82 वर्ष राहणार जुन्या पॉवर हाऊस जवळ लक्ष्मीनगर फलटण यांच्या राहते घरी दि 8 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास दोन परंपत्रिय इसमांनी अंगावरील दागिने पॉलिश करून देतो असे सांगून त्यांच्या अंगावरील सुमारे 6 ते 7 तोळ्याचे दागिने केमिकल मध्ये धुवून ते दागिने गॅस वर उकळण्यास ठेवण्यास सांगून हातचलाकी करून दागिने लंपास केले.
सदर दोन इसम हिंदी बोलणारे होते त्यांच्या हाता मध्ये डायरी व बॅग होत्या व त्यांनी इनशर्ट केलेले सेल्समन सारखे दिसत होते. सदरच्या दोन इसम सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहेत. सायंकाळी उशिरापर्यंत फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
दागिने पॉलिश करण्याचा बहाणा; वृध्देचे दागिने लंपास
RELATED ARTICLES