फलटण : फलटण नगर परिषद विविध विषय समिती व त्यांच्या सभापती निवडी नुकत्याच बिनविरोध पार पडल्या असून या नवनिर्वाचित समित्यांचे सभापती व समिती पदग्रहण समारंभ गुरुवार दि. 17 रोजी दुपारी 3.00 वाजता सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे उपस्थितीत नगर परिषद कार्यालयात संपन्न होणार असल्याची माहिती नगराध्यक्षा सौ. निताताई मिलींद नेवसे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
नगराध्यक्षा स्वत: स्थायी समिती (पदसिध्द) आणि उपनगराध्यक्ष नियोजन व विकास समिती (पदसिध्द) सभापती असून अॅड. सौ. मधुबाला दिलीपसिंह भोसले सार्वजनिक बाधकाम समिती सभापतीपदी, सौ. ज्योत्स्ना अनिल शिरतोडे पाणी पुरवठा व जलनिस्सारण समिती सभापतीपदी, अजय दत्तात्रय माळवे स्वच्छता, वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती सभापतीपदी, असिफ अब्दुल तथा बाळासाहेब मेटकरी शिक्षण, क्रिडा व सांस्कृतिककार्य समिती सभापतीपदी, सौ. सुवर्णा अमरसिंह खानविलकर व सौ. प्रगती जगन्नाथ कापसे महिला व बालकल्याण समिती सभापती व उपसभापतीपदी विराजमान होणार आहेत.
फलटण नगरपरिषदेचा विविध विषय समितीच्या सभापती चे आज पदग्रहण
RELATED ARTICLES