Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीफलटण येथे दलित संघटनांचा निषेध मोर्चा ; शहरात कडकडीत बंद

फलटण येथे दलित संघटनांचा निषेध मोर्चा ; शहरात कडकडीत बंद

फलटण (प्रतिनिधी) – भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करून, घटनेला जबाबदार असणाऱ्या आरोपीवर खून, जाळपोळ, दंगल घडवणे, मालमत्तेचे नुकसान करणे व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्या अन्वये गुन्हे दाखल करण्यात यावेत आदि मागण्यासह सर्व दलित संघटनाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. दरम्यान या घटनेच्या समर्थानात फलटण शहरातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने 100 टक्के बंद पाळला. त्याचबरोबर तालुक्यात ठिकठिकाणी बंद पाळण्यात आला. विडणी, पिंपरद, मुंजवडी, गुणवरे, बरड, गोखळी याठिकाणी बंद पाळून निषेध व्यक्त करण्यात आला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन मंगळवार पेठ येथून निघालेल्या मोर्चामध्ये सर्व दलित संघटनांचे पदाधिकारी, सदस्य, युवक युवती, महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्यासह अन्य पक्षीय पदाधिकारी मोठया संख्येने सामिल झाले होते. अत्यन्त शिस्तबध्द स्वरूपात व शांततेत हा मोर्चा शहरातील प्रमुख रस्त्यावरून प्रांत कार्यालय येथे आला. त्यांनतर निवेदन वाचून निवेदनाची प्रत उपविभागीय अधिकार संतोष जाधव व उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश चोपडे यांच्याकडे देण्यात आले.

भीमा कोरेगाव येथे पेशवे सैन्य व ब्रिटिशांच्या सैन्यात जोरदार लढाई झाली होती यामध्ये बॉम्बे नेटिव्ह इन्फ्रन्ट्री बटालियन च्या 500 महार सैनिकांनी मर्दुमकी गाजवून पेशवे यांच्या सैन्याचा पराभव केला होता याचा स्मरणार्थ भीमा कोरेगाव येथे 1 जानेवारी रोजी शौर्य दिन साजरा करण्यात येतो. यावर्षी या घटनेस 200 वर्ष पूर्ण होत असल्याने भीमा कोरेगाव येथे अभिवादनास जाणारांची संख्या जास्त होती आणि अशातच काही समाजकंटकांनी जाळपोळ, मारामारी करून दंगल घडवली, यामध्य मालमत्तेचे नुकसान होऊन, महिलांसह युवक व ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाले तर एकजण मृत्यमुखी पडला. या घटनेच्या निषेधार्थ फलटण येथे मोर्चा काढून, व कडकडीत बंद पाळून फलटण करणी या घटनेचा निषेध व्यक्त केला.

निषेध मोर्चा च्या पार्श्वभूमीवर मंगळवारी सांयकाळी फलटण पोलिसांनी घेतलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत आ दिपकराव चव्हाण, जी.प.अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, उपविभागीय अधिकार संतोष जाधव व उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश चोपडे,तहसीलदार विजय पाटील, पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत यांच्यासह युवक नेतृत्व दिगंबर आगवणे, भाजपाचे राज्य कार्यकारणी सदस्य डॉ वि.रा. त्रिपुटे, जिल्हा उपाध्यक्ष रवी दर फडतरे, उपनागराध्यक्ष नंदकुमार भोईटे, नगरसेवक अशोक जाधव, सचिन अहिवळे, काँग्रेस मराठा महासंघाचे नानासाहेब पवार, ऍड विरसेन कदम, सुधीर अहिवळे, राहुल निंबाळकर, अरुण खरात, भाऊ कापसे, पै पप्पू शेख, मुन्ना सबेख, विजय येवले, मधुकर काकडे, संजय निकाळजे, राजू मारुडा, सनी काकडे, हरीश काकडे, शाम अहिवळे, जय रणदिवे आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी निषेध मोर्चा शांततेच्या मार्गाने काढण्याचे सर्वानुमते ठरवण्यात आले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular