वाई : लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वलभूमीवर आज शहरामध्ये पोलीसांनी संचलन केले. उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद खोबरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमरसिंह निंबाळकर व 55 कर्मचारी संचलनात सहभागी झाले होते.लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वनभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नष निर्माण होऊ नये सर्वत्र शांतता राखण्यात यावी यासाठी पोलीस ठाण्याच्यावतीने शहरातून पोलीस संचलन करण्यात आले.
या संचलनात वाई, पाचगणी, महाबळेश्वार, मेढा व भुईंज येथील पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते.पोलीस ठाण्यापासून सुरू झालेले संचलन किसनवीर चौक, जामा मशिद, चावडी चौक, नगरपालिका, गंगापुरी, महागणपती मंदिर मार्गे पुन्हा पोलीस ठाणे असे करण्यात आले.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाई पोलीसांचे संचलन
RELATED ARTICLES