Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीजावळी तालुक्यातील रेशन दुकानदार पोलिसांच्या जाळ्यात

जावळी तालुक्यातील रेशन दुकानदार पोलिसांच्या जाळ्यात

 

सतारा :- जावली तालुक्यातील खर्शी तर्फे कुडाळ येथील रेशनिंग दुकानदार रामलाल आनंदराम गांधी हा रेशनिंगचा काळा बाजार करताना ग्रामस्थानच्या सतर्कतेमुळे रंगेहात सापडला,

कोरोनामुळे ग्रामीण भागात सर्वसामान्य जनतेला धान्य पुरवठा होण्यासाठी रेशनिंग हाच एकमेव पर्याय आहे ,शासनाने देखील सर्वाना योग्य दरात रेशनिंग मिळावे म्हणून तसे आदेश देखिल दिले आहेत मात्र जावली तालुक्यातील काही रेशनिंग दुकानदार मात्र सर्वसामान्य जनतेचे रेशनिंग दाबून इतर ठिकाणी काळ्या बाजाराने विक्री करत आहेत तश्या प्रकारे कालच जावली तालुका भाजपचे अध्यक्ष श्रीहरी गोळे यानी तहसीलदार शरद पाटील यांना निवेदन दिले होते,तसेच त्यानी देखील यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असे सांगितले होते,

खर्शी ग्रामपंचायतिमध्ये सरपंच व उपसरपंच यांच्याकडे गावातील महिला व ग्रामस्थ रेशनिंग संदर्भात तकरारी करत असताना दुपारच्या वेळी येथील रेशनिंग दुकानदार गांधी हे बाहेरुन आलेल्या कुडाळ टेम्पो मध्ये दोन रुपये किमतीने सर्वसामान्य जनतेला देत असलेला गहु 17 रुपये दराने विक्री करुण गाड़ी मधे  भरत असताना ग्रामस्थ व तरुणानि चौकशी केली असता रेशनिंगचे धान्य त्यामध्ये दिसून आले, सरपंच रामचंद्र मुळीक, उपसरपंच विट्ठल शिवनकर,तंटा मुक्ति अध्यक्ष आंचलदास सोनावणे,पोलिस पाटिल सुहास भोसले यांनी, तात्काळ पुरवठा अधिकारी धुमाळ एच् एल,तलाठी डोईफोड़े एम आर याना माहिती दिली त्यानी तात्काळ त्या ठिकाणी येवून सबंधित दुकानदाराची माहिती घेतली असता हे रेशनिंग काळ्या बाजाराने विक्रिस काढले असल्याचे निदर्शनास आले,

सम्बन्धित दुकानदार गांधी यांच्या सह गाड़ी चालक व खरेदी करणार यांच्या सह तिघाच्या वर  कुडाळ पोलिस स्टेशन ला गुन्हा नोंद  करण्याचा रात्रि उशिरा पर्यंत चालू होता पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संतोष चामें करीत आहेत 

एकीकडे हक्काचे रेशनिंग मिळत नसल्याने लॉकडॉउनमध्ये प्रपंच कसा चालवायचा यांचा प्रश्न जनतेपुढे पडलेला असताना असे काळा बाजार करणाया दुकानदारांवर कड़क कारवाई करावी-     –आचलदास सोनावणे,अध्यक्ष तंटामुक्ती कमिटी खर्शी तर्फ कुडाळ

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular