केळघर: सध्याच्या धकाधकीच्या जीवनात दैनंदिन कामकाज करत असताना पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावर मोठा ताण असतो . तो कमी व्हावा व त्यांचे आरोग्य चांगले रहावे . यासाठी नियमित आरोग्य तपासणी करून घ्यावी . असे आवाहन मेढा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरिक्षक निलकंठ राठोड यांनी केले .
प्राथमिक आरोग्य केंद्र केळघर ( ता. जावली ) येथे मेढा पोलीस स्टेशनतर्गंत येणार्या सर्व अधिकारी , कर्मचारी यांची आरोग्य तपासणी व आहार विषयी मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते . यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ . साधना कंवारे, पोलीस उपनिरिक्षक संतोष चामे , अजित पाटील, सरपंच रविंद्र सल्लक , आरोग्य सहाय्यक विशाल रेळेकर , सतीश मदैकर आदी ची यावेळी प्रमुख उपस्थित होती .
यावेळी डॉ . साधना कंवारे म्हणाल्या , पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर सततच्या कामाचा मोठा ताण असतो . तो दूर व्हावा आणि तणावमुक्त रहाण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी व व्यायाम करणे गरजेचे आहे .
यावेळी मेढा पोलीस स्टेशनतर्गत येणार्या तीन अधिकारी व 22 पोलीस कर्मचारी यांची साखर तपासणी , हिमोग्लोबिन तपासणी, बीपी , लिव्हर फंक्शन , रिनल फंक्शन , थायरॉइड फंक्शन , कम्पलिट ब्लड काऊंट आदि आजारांच्या तपासण्या करण्यात आल्या. याकामी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी , कर्मचारी यांनी परिश्रम घेतले .
पोलीस कर्मचार्यांनी तणावमुक्त रहाण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी करावी ः सपोनि निलकंठ राठोड
RELATED ARTICLES