मेढा ( वार्ताहर ) – २२ एप्रिल २०२० पासून मेढा बाजारपेठ सकाळी ९ ते २ या वेळेत सुरू झाल्याने या बाजारपेठेवर मेढा पोलिस कर्मचारी यांची करडी नजर असून जर कोणी विनाकारण बाहेर फिरत असेल तर त्याचा योग्य तो समाचार घेतला जात आहे .
मेढा पोलिस स्टेशनचे स.पो. नि.निळकंठ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली मेढा पोलिस स्टेशनचे २ पो. उपनिरीक्षक आणि ३८ कर्मचारी आपले काम प्रामाणिकपणे पार पाडत आहेत. लॉक डाऊन परिस्थीतीत आत्तापर्यत विनाकारण बाजारपेठेत फेरफटका मारणाऱ्या दुचाकीस्वारावर कारवाई करण्यात आली असून यामुळे इतर दुचाकीस्वार शहाणे झाले आहेत. मेढा बाजार चौक , वेण्णा चौक येथे कर्मचारी वर्ग बाहेरील येणाऱ्या वाहनांची कसून चौकशी करत आहेत. बाजारपेठेत ग्राहकांना अंतर ठेवून, बाजार खरेदी लाईनमध्ये कोणताही गोंधळ न करता बाजार करणे यावर त्यांचे लक्ष असून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही दक्षता घेतली जात आहे. मेढा आणि परिसरातुन विविध क्षेत्रात काम करणारे अत्यावश्यक सेवा कर्मचारी यांचेआयडेंटी कार्ड पाहून तसेच दवाखान्यात येणारे पेशंट यांची योग्य चौकशी करून त्यांना सोडण्यात येत आहे विनाकारण चकाट्या मारणारे नागरीक यांचे वर मात्र योग्य ती कारवाई करण्यात येत आहे.
कोरोना विषाणूचा फैलाव याने संपूर्ण जावली धास्तावली असून वाढत्या रुग्णांची संख्या ने सर्वांच्या काळजात धस्स झाले आहे.जावलीतील निझरे, म्हाते मुरा या गावातील रहिवाशी यांनी कोरोनाची भिती घेतली असून संपूर्ण गाव लॉक डाऊन केल्याने आजुबाजुची गावांतील नागरीकांचीही तपासणी करण्याचे आवाहन जावलीचे तहसिलदार शरद पाटील यांच्या पुढे निर्माण झाले असून प्रशासनाने मात्र कोरोनाला हद्दपार करण्यासाठी कंबर कसली आहे.
मेढा बाजारपेठेवर पोलिस कर्मचारी यांची करडी नजर
RELATED ARTICLES