सातारा : सातारा जिल्हा बँकेचे माजी खासदार, बँकेचे माजी अध्यक्ष, आदरणीय लक्ष्मणराव पाटील (तात्या) यांचे निधनामुळे तसेच काश्मीर, पुलवामा येथील शहीद जवानांच्या प्रती आदरांजली म्हणून प्रकाशभाऊ बडेकर यांनी आपला वाढदिवस प्रतिवर्षीप्रमाणे मोठ्या प्रमाणावर्ती विविध सामाजिक कामातून साजरा न करता अत्यंत साधेपणाने करण्याचा निर्णय घेतला. या त्यांच्या निर्णयामुळे बँकेचे अध्यक्ष आ. श्री. छ. शिवेन्द्रसिंहराजे भोंसले म्हणाले कि, प्रकाशभाऊ बडेकर हे स्वर्गीय श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोंसले यांच्या विचारांवर श्रद्धा व निष्ठा ठेऊन कार्य करीत असलेने अशा प्रसंगी त्यांनी वाढदिवस साधेपणाने करण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे.
सातारा जिल्हा बँकेचे संचालक मंडळ, प्रकाशभाऊ यांच्या सामाजिक कार्यासाठी नेहमीच पाठबळ देत आलेले आहे. प्रकाशभाऊ बडेकर यांना सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल, माजी खासदार श्रीनिवास पाटील यांनीही शुभेच्छ्या दिल्या.
याप्रसंगी महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापतीना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर,यानी बँकेचे संचालक प्रकाशभाऊ बडेकर यांनी साधेपणाने वाढदिवस करण्याच्या निर्णयाचा मी स्वागत करीत आहे. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची परंपरा हि नेहमीच समाजाभिमुख व विकासाची राहिलेली आहे.
याप्रसंगी संचालक आ. शशिकांत शिंदे, आ. जयकुमार गोरे, आ. बाळासाहेब पाटील, जेष्ठ संचालक व माजी मंत्री विलासराव पाटील- उंडाळकर, माजी मंत्री व जेष्ठ संचालक विक्रमसिंह पाटणकर तसेच जेष्ठ संचालक व माजी अध्यक्ष श्रीमंत दादाराजे खर्डेकर, माजी आ. प्रभाकर घार्गे, दत्तानाना ढमाळ, नितीन काका पाटील, प्रा. अर्जुनराव खाडे, जि.प.उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, अनिल देसाई, प्रदीप विधाते, संचालिका सुरेखा पाटील, कांचनताई साळुंखे, जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे तसेच सरव्यवस्थापक एम. व्ही.जाधव व राजेंद्र गाढवे, सेवक प्रतिनिधी रवी साळुंखे व विक्रम शितोळे, अधिकारी सुजित शेख, राजेंद्र भिलारे, शामराव गायकवाड, संजय इथापे, तसेच बँकेच्या मुख्य कार्यालयातील सर्व विभागांचे उपव्यवस्थापक, अधीक्षक उपस्थित होते.
प्रकाश बडेकर यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा
RELATED ARTICLES

