Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीश्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) स्मृतीसेवा पुरस्कार फरोख नरिमन कुपर यांना जाहीर

श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) स्मृतीसेवा पुरस्कार फरोख नरिमन कुपर यांना जाहीर

सातारा : श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) यांच्या 225 व्या जयंतीचा सोहळा सातारा नगरपरिषदेच्या वतीने श्री.छ. शिवाजी सभागृहात गुरुवार दिनांक 18 जानेवारी 2018 रोजी सकाळी 11.00 वाजता संपन्न होणार आहे.
श्री. छ. प्रतापसिंह महाराज प्रजाहित दक्ष राजे होते. सनदशिर राजकारणाचे पुरस्कर्ते होते. पहिले निशस्त्र सत्यागृही होते. साताराच्या सर्वांगीण विकासाचे पहिले शिल्पकार होते. त्यांची स्मृती आजही वंदनीय अशी आहे. सातारा नगरपरिषद दरवर्षी कृतज्ञता भावाने त्यांच्या स्मृतीस अभिवादन करते. या जयंती निमित्ताने प्रतिवर्षी श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले ) स्मृतीसेवा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, पुष्पहार अशा स्वरुपाचा हा पुरस्कार प्रदान करणेत येतो. यावर्षी हा बहुमानाचा पुरस्कार सुप्रसिद्ध उद्योजक मा. श्री. फरोख नरिमन कुपर यांना सपत्निक सदर पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करणेत येणार आहे.
सन 2007 पासून अनुक्रमे संभाजीराव पाटणे सर, श्रीमती लिलाताई क्षीरसागर, प्रा. पुरुषोत्तम शेठ, डॉ.आ.ह. साळुंखे, गुरुवर्य बबनराव उथळे, डॉ. अविनाश पोळ, डॉ. रविंद्र हर्ष, डॉ. आनंद कोल्हटकर, डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर, डॉ. उमेशचंद्र तावडे,डॉ. मधुकर वसंत पारंगे यांना हा पुरस्कार प्रदान करणेत आला आहे.
गुरुवार दि. 18 जानेवारी 52018 रोजी सकाळी 10.30 वाजता राजवाड्या समोरील गोल बागेतील श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन 11.00 वाजता नगरपरिषदेच्या श्री.छ्। शिवाजी सभागृहात मान्यवरांच्या हस्ते श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) स्मृती सेवा पुरस्कार प्रदान सोहळा आयोजीत करणेत आला आहे.
श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) जयंती सोहळा व पुरस्कार प्रदान सोहळा मा. खासदार श्री.छ. उदयनराजे भोसले, यांचे हस्ते होणार असून प्रमुख उपस्थिती संभाजीराव पाटणे सर तसेच सर्व सभापती, नगरसेवक,नगरसेविका उपस्थित राहणार आहेत. नागरीकांनी या सोहळ्यास उपस्थित रहावे, असे आवाहन नगराध्यक्षा सौ. माधवी संजोग कदम, उपनगराध्यक्ष श्री राजू तूकाराम भोसले व कला, क्रीडा व सांस्कृतीक समिती प्रमुख सौ.सुजाता सागर राजेमहाडीक यांनी केले.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular