Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीसुंदरगडावर ( घेरादात्तेगड ) शिवजयंतीची जय्यत तयारी सुरू

सुंदरगडावर ( घेरादात्तेगड ) शिवजयंतीची जय्यत तयारी सुरू

पाटण:- सोमवार दि. १९ फेब्रुवारी रोजी सर्वत्र साजरी होत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त पाटण महालातील प्रमुख असलेल्या सुंदरगड ( घेरादात्तेगड ) वर “छत्रपती शिवजयंती” साजरी करण्यासाठी शिवमावळ्यांची लगबग सुरू झाली असून रविवार दि. १८ फेब्रुवारी पासूनच सुंदरगडावर छत्रपती शिवजयंती कार्यक्रमास सुरुवात होणार आहे.
रविवार दि. १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते १ वा. “सुंदरगड” दुर्ग पुजन, ध्वज पुजन, “छत्रपती शिवाजी महाराज” यांची प्रतिमा पूजन, शिवज्योत पुजन आणि शिववंदना असा कार्यक्रम होणार आहे. दुपारी १ ते ४ वा.गडभ्रमंती आणि स्वच्छता. सायंकाळी ४ ते ७ वा. सुंदरगडावर आलेल्या शिवमावळ्यांचा उत्स्फूर्त शिवव्याख्यान आणि कलारंजन कार्यक्रम ७.३० वा. मशाल फेरी. रात्री ९ वा. पासून पुढे शिवजागर,
सोमवार दि. १९ फेब्रुवारी रोजी सकाळी ७.३० ते १० वा. छत्रपती शिवप्रतिमा अभिषेक व पुजन, शिवजयंती उत्सव, आणि शिववंदना. आणि सुंदरगडावर आलेल्या सर्व शिवजयंती उत्सव समिती, मंडळ यांचा शिवज्योत प्रज्वलित व पुजन कार्यक्रम आणि सर्व शिवज्योतीचें प्रस्थान कार्यक्रम आयोजित केला आहे.
सुंदरगड ( घेरादात्तेगड ) वर होणा-या दोन दिवसीय “छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव सोहळ्यास पाटण महालातील सर्व शिवजयंती उत्सव समिती, मंडळे आणि परिसरातील सर्व गावातील युवा – युवती, नागरीकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सुंदरगड संवर्धन समितीने केले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular