साताराः वाहतूक नियमाचे पालन हे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आहे. दंडात्मक कारवाईची रक्कम ही पोलीस दलाला मिळत नाही तर कोषागारात प्रत्येक दिवशी जमा केली जाते. पोलीस हे फक्त कायदा व सुव्यवस्थेचे रक्षक आहेत असे स्पष्ट करून वाहनांवर प्रेस लिहिणे कायदेशीर नसल्यामुळे वाहतूक शाखेच्या पोलीसांनी अशा वाहनांवर प्रेस लिहिले असेल तर कारवाई करावी अशी सक्त सुचना सातारच्या पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना केली.
सातार्यातील वाहतूक शाखेबाबत व एक राज्य एक ईचलन या कार्यप्रणालीची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली होती. यावेळी अप्पर पोलीस अधिक्षक धीरज पाटील, जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप भागवत, सपोनि सुरेश घाडगे उपस्थित होते.
दंडात्मक कारवाई करताना डेबीट, क्रेडीट कार्ड स्वरूपात स्वीकारली जाणार आहे. स्वतंत्र यंत्रणा कॅमेरा रेकॉर्डींग पुराव्यासह परिपूर्ण असल्याने पारदर्शकता येणार आहे. रस्त्यावर वाहन चालकांवर कारवाई बाबत चालकांमधे शिस्त वाढीस लागून अपघातांना आळा बसणार आहे. दि.1 जून पासून ई चलन प्रकल्पाचा शुभारंभ झाला असून यापुर्वी ई चलनाबाबतचे प्रशिक्षण 3 सत्रात घेण्यात आले होते. याची माहिती दिली. सिग्नल जंपींग ट्रिपल सीट यावरती कारवाई होत असल्याने अपघात टळणार आहे. अतिक्रमण हटवणे हे स्थानिक स्वराज्याचे काम आहे तसेच रात्री 8 ते सकाळी 8 वाजेपर्यंत व्यापार्यांनी रस्त्यालगत आपला व्यवसायीक मालाची ने आण करावी इतर वेळी ट्राफीक जाम होण्याची शक्यता आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
सातारा जिल्हयात 765 पन्नास वर्षाच्या आतील स्त्री पुरूषांना होमगार्ड मध्ये काम करण्याची इच्छा असेल तर त्यांना प्रतिदिन 700 रूपयाप्रमाणे वर्षातील 200 दिवस काम मिळणार आहे. तसेच पोलीस व अग्निशामक दलात भरती होण्यासाठी 5 टकके आरक्षण दिले आहे त्यामुळे होमगार्ड मध्ये सातारा जिल्हयात भरती होण्यासाठी 20 व 21 जून रोजी सकाळी 6 वा. पोलीस कवायत मैदानावर इच्छुकांनी हजर रहावे यासाठी त्यांनी होमगार्ड वेबसाईट किंवा कवायत मैदानावर अर्ज उपलब्ध होणार आहे. दहावी पास पुरूषांसाठी 1600 मी. व महिलांसाठी 800 मी. धावणे,गोळा फेक, लेखी परीक्षा, व कागदपत्र पडताळणी असे भरतीचे स्वरूप असणार आहे अशी माहिती धीरज पाटील यांनी दिली.
वाहनांवर प्रेस लिहिणे कायदेशीर नसल्यामुळे कारवाई करावी- पोलीस अधिक्षक
RELATED ARTICLES