Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीपत्रकार संरक्षण कायद्याच्या अंतिम निर्णयासाठी राष्ट्रपतींना भेटणार : एस.एम. देशमुख.

पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंतिम निर्णयासाठी राष्ट्रपतींना भेटणार : एस.एम. देशमुख.

पाटण दि. – पत्रकार स्वरक्षण कायदा महाराष्ट्र शासनाने मंजूर केला असून तो अंतिम स्वाक्षरी साठी राष्ट्रपतींच्याकडे गेला आहे. या संदर्भात आम्ही राष्ट्रपतीना भेटणार आहोत. त्याच बरोबर पुढील महिन्यात राज्य शासनाच्या होणार्या अधिवेशनात पत्रकार पेन्शन आणि पत्रकार अधिस्वीकृती बाबत राज्य शासनाला ठोस निर्णय घेण्यास भाग पाडणार आहोत असे महाराष्ट्र राज्य पत्रकार संरक्षण कायदा कृती समितीचे अध्यक्ष एस.एम. देशमुख पाटण येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.
राज्यातील पत्रकारांना अधिस्वीकृती मिळणे व अधिस्वीकृती समितीच्या म्हतवाच्या बैठकीसाठी पुण्यावरून रत्नागिरी ला जाताना महाराष्ट्र राज्य पत्रकार संरक्षण कायदा कृती समितीचे अध्यक्ष एस. एम. देशमुख, मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त मा. किरण नाईक आणि पुणे जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष मा. सुनील वालुंजकर यांनी पाटण येथे भेट दिली. काल शुक्रवारी रात्री उशिरा १ वा. पाटण येथील गेस्ट हाऊस वर त्यांचे आगमन झाले. आज सकाळी ७.३० वा. पाटण गेस्ट हाऊस वरून त्यांचे रत्नागिरीला प्रस्थान झाले. यावेळी पाटण तालुका पत्रकार संघाच्या वतीने अध्यक्ष शंकरराव मोहिते यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष विक्रांत कांबळे, पत्रकार सुरेश संकपाळ, विकास हादवे उपस्थित होते. यावेळी मा. एस. एम. देशमुख, मा. किरण नाईक यांनी राज्यातील पत्रकारांच्या अडी- अडचणी व प्रश्नांबाबत चर्चा केली. पत्रकार स्वरक्षण कायदा महाराष्ट्र शासनाने मंजूर केला असून तो अंतिम स्वाक्षरी साठी राष्ट्रपतींच्याकडे गेला आहे. या संदर्भात आम्ही राष्ट्रपतीना भेटणार आहोत. त्याच बरोबर पुढील महिन्यात राज्य शासनाच्या होणार्या अधिवेशनात पत्रकार पेन्शन आणि पत्रकार अधिस्वीकृती बाबत राज्य शासनाला ठोस निर्णय घेण्यास भाग पाडणार आहोत असे त्यांनी यावेळी भेटीत सांगितले. पाटण तालुका पत्रकार संघाच्या कामाबाबत त्यांनी आढावा घेतला व पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या.

.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular