म्हासुर्णे प्रतिनिधी . ता.खटाव जि.सातारा(तुषार माने ) / प्रतिनिधी : शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर अंतर्गत घेण्यात आलेल्या बी.एस.सी. परिक्षेत शहाजीराजे महाविद्यालय खटाव येथील विद्यार्थीनी व भुरकवडी विकास सेवा सोसायटीचे मा. चेअरमन, पत्रकार शरदराव कदम यांची पुतणी कु.प्रिया तानाजीराव कदम हिने शिवाजी विद्यापीठात बी.एस.सी. मॅथेमेटिक्स या विषयात पदवी प्राप्त करून शिवाजी विद्यापीठात ५ वा क्रमांक मिळवून सुयश संपादन केले. या विद्यार्थीनीला हेड ऑफ डिपार्टमेंटचे आर.एन. खराडे, विषय शिक्षक महेश चव्हाण, अमित भिसे, प्राची पवार, रविना गाढवे, योगेश कर्णे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल शहाजीराजे महाविद्यालयाचे अध्यक्ष अजित पाटील, प्राचार्य संजय पाटील, मा.आमदार डॉ.दिलीपराव येळगावकर, प्रभाकर घार्गे, माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख, हरणाई सूतगिरणीचे संस्थापक अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, युवा नेते शेखरभाऊ गोरे, समाजकल्याण सभापती शिवाजीराव सर्वगोड, प्रदिप विधाते, सभापती कल्पना मोरे, संदीप मांडवे, प्रा.सौ.नम्रता भोसले, प्रा.पी.डी.कुलकर्णी, प्रा.जी.व्ही. कदम, तसेच सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षेकेतर कर्मचारी आदिनी या विद्यार्थीनीचे कौतुकास्पद अभिनंदन केले.