Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडी‘आपले पोलीस आपली अस्मिता’  लोकराज्य विशेषांकाचे पोलीस अधीक्षकांच्या हस्ते प्रकाशन

‘आपले पोलीस आपली अस्मिता’  लोकराज्य विशेषांकाचे पोलीस अधीक्षकांच्या हस्ते प्रकाशन

सातारा :  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने जानेवारी 2018 चा  लोकराज्य अंक स्मार्ट, समर्थ, संवेदनशील आपले पोलीस आपली अस्मिता हा पोलीस विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रकाशित करण्यात आला आहे. या लोकराज्य विशेषांकाचे प्रकाशन पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले.
यावेळी पोलीस अधीक्षक संदीप पाटील म्हणाले, माहिती व जनसंपर्क विभागाने आपले पोलीस आपली अस्मिता या विषयावरील विशेषांकामध्ये   पोलीस विभागाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला आहे.  दहशतवाद, नक्षलवाद, आर्थिक गुन्हेगारी, सायबर गुन्हेगारी  या सर्व प्रकारच्या आव्हानांना लोकांच्या सहकार्याने पोलीस विभाग समर्थपणे  सामना करत आहे.  हा अंक अत्यंत सुंदर असून पोलीस दलाचे कार्य विस्तृत स्वरुपात सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचणार आहे. यामुळे पोलीस विभागास सर्व सामान्य नागरिकांचे सहकार्य वाढण्यास निश्चीत मदत होईल, असा विश्वासही त्यांनी  व्यक्त केला.
या अंकामध्ये महाराष्ट्र पोलीस सिटीझन, प्रतिसाद, हेल्पलाईन, सायबर गुन्हे, महिला व बाल सुरक्षा, पोलीस दलात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सुरक्षित वाहतूक, दहशतवाद व नक्षलवादाचा बीमोड, फोर्स वन, शोध आणि मुस्कान, पोलीस प्रशिक्षण,पोलीस विभागाच्या योजना, अभ्यास केंद्रे, ऑनलाईन तक्रारीची सुविधा, गृहरक्षक दल इत्यादींवर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. लोकराज्य अंक हा अतिशय लोकाभिमुख आणि वाचनीय आहे.   युवकांना हे मासिक स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळे त्यांनीही हा अंक नियमित    वाचावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक पाटील  यांनी यावेळी केले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular