सातारा.दि.10 (जिमाका): सातारा जिल्हृयात पल्स पोलीओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आज जिल्हा रुग्णालय येथे जिल्हाधिकारी श्वेता सिंघल,जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला.
जिल्हृयात या वर्षी पल्स पोलीओ मोहिमे अंतर्गत 0 ते 5 वर्षा खालील एकुण 243562 बालकांना पल्स पोलिओ लस देण्याचे उद्दीष्ट असून या लार्भाथ्यांना ग्रामीण भागात 2304 व शहरी भागात 153 पल्स पोलीओ लसीकरणाचे बुथ स्थापन करण्यात आले आहेत. रेल्वे स्टेशन,बस स्टॅड, टोल नाके, इ. 178 ठिकाणी ट्रान्झिट पथका द्वारे व विटभट्टी, ऊसतोड कामगार, इ. साठी एकूण 171 मोबाईल पथके संपुर्ण जिल्ह्यात कार्यरत ठेवण्यात आलेली आहेत.
पल्स पोलीओ लस मोहिम यशस्वी करण्या करीता जिल्हा शल्य चिकीत्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली 140 वैद्यकीय अधिकारी, आर.वी. एस. के.पथके व 6524 कर्मचारी नियुक्त करण्या आलेली आहेत. सदरची मोहिम सकाळी 8 ते सायंकाळी 6 वाजे पर्यंत राबवण्यात आली. जिल्हा स्तरीय कार्यक्रमाच्या शुभारंभ प्रसंगी जिल्हा शल्य चिकीत्सक, डॉ. आमोद भा.गडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. भगवान पवार,डॉ.उज्ज्वला माने,डॉ.सुधीर धुमाळ,निवासी वैद्यकीय अधिकारी, माता बाल संगोपन अधिकारी, डॉ. प्रमोद शिर्के, तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
आज जिल्ह्यात पल्स पोलिओ लसीकरण मोहिम संपन्न ; जिल्हाधिकाऱ्यांनी दिला लसीकरण टिका
RELATED ARTICLES