Tuesday, June 24, 2025
Homeताज्या घडामोडीपूर नियंत्रण कक्षाची स्थापना

पूर नियंत्रण कक्षाची स्थापना

सातारा : पावसाळ्यात येणार्‍या पूर परिस्थिती व अशा प्रकारच्या सर्व नैसर्गिक आपत्तीस समर्थपणे तोंड देण्यासाठी तसेच शासन, अधीक्षक अभियंता, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस विभाग यांना अधिकृत माहिती देण्यासाठी कार्यकारी अभियंता कृष्णा सिंचन विभागात पूर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.
या कक्षाचे कक्ष अधिकारी म्हणून व्ही.टी. मोटे, उप कार्यकारी अभियंता, कृष्णा सिंचन विभाग कृष्णानगर, सातारा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 02162-244481 असा आहे. कक्ष अधिकारी यांना सहायक म्हणून अनुरेखक ए.एन. महामुनी यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. पूर नियंत्रण हा कक्ष 1 जून ते 15ऑक्टोंबर 2019 पर्यंत कार्यरत राहणार आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular