वडूज: येथील हुतात्मा परशुराम विद्यालयातील कु. राधिका संजय इंगळे हिने नुकत्याच जाहीर झालेल्या एन.एम.एम.एस. परीक्षेत राज्यात सर्वप्रथम येण्याचा बहुमान पटकवला आहे. तिने या परिक्षेत 177 पैकी 165 गुण मिळवून दैदिप्यमान कामगिरी केली आहे. ती येथील मंगेश लंच होमचे मालक संजय इंगळे यांची सुकन्या असून इयत्ता 8 वी मध्ये शिकत आहे.
या यशाबद्दल वडूज शिक्षण मंडळ व शहरातील मित्र मंडळांच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी विश्वस्त विश्वासराव काळे, सी. ए. जाधव, गोविंद भंडारे, माजी जि. प. सदस्य प्रा. बंडा गोडसे, प्राचार्य ए. टी. काळे, उपमुख्याध्यापक एस. डी. आवटे, मिलींदकुमार घार्गे, सौ. दौंड, बाजार समितीचे संचालक विजय काळे, राष्ट्रीय खेळाडू जावेदभाई मनोरे, क्रिडाशिक्षक राजेंद्र जगदाळे, अंबादास भंडारे, किरण कांबळे, व्ही. बी. शेंडगे, सौ. देशपांडे, सौ. शिंदे, सौ. शेटे, सौ. भिंगारदेवे पालक श्री. व सौ. इंगळे आदिंसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रा. गोडसे, श्री. काळे यांनी बोलताना कु. राधिका व मार्गदर्शक शिक्षकांचे मनोभावे कौतुक केले. तसेच तिच्या यशामुळे पालक व शाळेबरोबर वडूजचा राज्यभर नावलौकीक वाढणार असल्याचे सांगितले.

