रहिमतपूर: गोगावलेवाडी (ता. कोरेगाव) येथे मिठाचा पुडा आणण्यासाठी गेलेल्या गणेश शिंदे यास किराणा दुकानदाराने डोक्यात कोयता घालून मारून गंभीर जखमी केले. याबाबतची फिर्याद मुलाची आई मालन बबन शिंदे यांनी रहिमतपूर पोलीस ठाण्यात दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दि.24 फेब्रुवारी रोजी सकाळी मालन शिंदे या स्वयंपाक करीत असताना घरातील मीठ संपले होते. त्यामुळे मुलगा गणेश यास आणण्यासाठी सांगितले परंतु, तो लवकर आला नाही म्हणून बाहेर पाहिले असता शेजारील किराणा दुकानदार लालासाहेब केंजळे यांचा गणेश याचे बरोबर वाद चालू होता. त्यावेळी मिठाचा पुडा दहा रुपयाला असतो गणेश याच्याकडे एक रुपया कमी असल्याने तो नंतर आणून देतो. परंतु, किराणा दुकानदार केंजळे यांनी मिठाचा पुडा उधार देत नाही असे म्हणत शिवीगाळ व दमदाटी केली. म्हणून गणेश यानेसुद्धा शिवी दिली.
दरम्यान, लालासाहेब केंजळे यांनी जीवे मारण्याची उद्देशाने गणेश केंजळे याच्या डोक्यात कोयत्याने मारहाण करीत गंभीर जखमी केले. या घटनेचा तपास पीएसआय जगदाळे हे करीत आहेत.
रूपायासाठी किराणा दुकानदाराकडून कोयत्याने वार
RELATED ARTICLES