Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीरहिमतपूर नगरपरिषद उपनगराध्यक्षपदी चाँदभाई आतार

रहिमतपूर नगरपरिषद उपनगराध्यक्षपदी चाँदभाई आतार

रहिमतपूर: रहिमतपूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी चाँदभाई बादशाह आतार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी विनायक औंधकर, लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव कोरे, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सुनिल माने, पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा चित्रलेखा माने-कदम, मावळते उपनगराध्यक्ष विद्याधर बाजारे, नगरसेवक शिवराज माने, शशिकांत भोसले, रमेश माने, निता विक्रमसिंह माने, जोत्स्ना जितेंद्र माने, सुनिता धनंजय पवार, सुरेखा विनायक माने, पद्मा भरत घोलप, सुजाता तानाजी राऊत,बेदिल उत्तमराव माने, निलेश संपतराव माने, सर्व नगरसेवक,सर्व नगरसेविका उपस्थित होते.
यावेळी मुख्याधिकारी यांच्याकडे उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी दि.21 रोजी सकाळी 10ते 12 वाजेपर्यंत चाँदगणी बादशाह आतार यांचे सुचक रमेश जयसिंग माने,व अनुमोदक विद्याधर शंकर बाजारे असल्याचे नामनिर्देशन पत्र प्राप्त झाल्यानंतर ते प्राप्त नामनिर्देशन पत्र पीठासीन आधिकारी लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव कोरे,व मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी सादर केले. त्याची छाननी करण्यात आली. व वैद्य अर्ज असल्याचे सभेस सांगण्यात आले.
नामनिर्देशन पत्र मागे घेण्यासाठी पंधरा मिनिटे देण्यात आला. देण्यात आलेल्या मुदतीत कोणीही नामनिर्दशन पत्र मागे न घेतल्याने नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी चाँदगणी बादशाह आतार यांचा एकमेव उमेदवारी अर्ज आल्याने उपनगराध्यक्षपदी बिनविरोध निवडून आल्याचे नगराध्यक्ष आनंदराव कोरे यांनी जाहीर केले. यावेळी माजी नगराध्यक्ष अविनाश माने,प्रा.भानुदास भोसले, बबलुभाई शेख, जेष्ठ नागरिक,बहुसंख्येने उपस्थित होते. आभार शिवराज माने यांनी मानले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular