रहिमतपूरः रहिमतपूर नगरपरिषद त्रयस्थ संस्थेमार्फत बेघर/ निराधारांचे सर्वेक्षण करत आहे. जे फूटपाथवर, चौकात किंवा बसस्थानक परिसरात राहतात ज्यांना आपल्या रहिमतपूर नगरपरिषद क्षेत्रामध्ये कोणतेही घर नाही. जे लोक रस्त्यावर किंवा राहण्यायोग्य नसलेल्या परिस्थितीमध्ये राहतात, त्यांच्याकडे अनुकूल सुविधा नसतात. रहिमतपूर नगरपरिषद अशा व्यक्तींना संभावित निवारा देण्यासाठी आणि मूल्यमापन करण्याच्या कारणास्तव बेघरांच्या सर्वेक्षणाद्वारे सर्वसाधारण तपशील, कौटुंबिक आणि सामाजिक आर्थिक परिस्थिती, आरोग्य स्थिती संदर्भात तपशील गोळा करीत आहे. आपल्या शहरातील सर्व भागामध्ये सर्वेक्षक जाऊन बेघरांचे सर्वेक्षण दि. 13 जून 2019 ते 14 जून 2019 या कालावधीमध्ये दिवसा/रात्री करण्यात येणार आहे. सर्व बेघरांचे सर्वेक्षण होण्यामध्ये नागरिकांनी सहकार्य करावे. जर त्यांना असे निराधार किंवा बेघर लोकं रस्त्यांवर किंवा इतर भागात आढळल्यास 7997007167 या क्रमांकावर संपर्क साधून सर्वेक्षणामध्ये मदत करावी. ज्यामुळे रहिमतपूर नगरपरिषदेला अशा बेघरांना निवारा देण्यास मदत होईल असे आवाहन मा. मुख्याधिकारी तथा शहर प्रकल्प अधिकारी, दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान यांनी केले आहे.
दि. 13 व 14 रोजी रहिमतपूर येथे शहरी बेघर लोकसंख्येचे सर्वेक्षण
RELATED ARTICLES