Friday, June 20, 2025
Homeठळक घडामोडीराज्य उत्पादन शुल्क ,सातारा विभागाची सातारा शहरालगत अवैध वाहतूक व विक्रीवर धडक...

राज्य उत्पादन शुल्क ,सातारा विभागाची सातारा शहरालगत अवैध वाहतूक व विक्रीवर धडक कारवाई ; देशी दारूचे तब्बल ३८ बॉक्स जप्त

सातारा :- कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉक डाऊन असताना माननीय विभागीय उपायुक्त , राज्य उत्पादन शुल्क , कोल्हापूर श्री वाय एम पवार यांच्या आदेशान्वये श्री अनिल चासकर, अधीक्षक ,राज्य उत्पादन शुल्क, सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध मद्याची तस्करी रोखण्यासाठी निरीक्षक , राज्य उत्पादन शुल्क ,सातारा विभाग गस्त घालत असताना, त्यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरून दिनांक 26 /04 / 2020 रोजी सायंकाळी सातारा येथील जुनी एमआयडीसी येथून हायवेच्या दिशेने जाणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ या संशयित वाहनाची तपासणी केली असता या वाहनामध्ये देशी दारूचे विविध ब्रँड चे 38 बॉक्स मिळून आले . या मालाची वाहनासह एकूण मिळून 7,97,032/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदर कारवाई मध्ये आकाश माने रा. कोडोली याच्यावर गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली आहे . तसेच गुन्ह्यात पुढील तपासात सौ. एस एस भोसले किरकोळ देशीदारू दुकान कोडोली , सातारा या अनुज्ञप्तीवर विभागीय गुन्हा नोंद करण्यात आला आहे .
सदर कारवाई निरीक्षक श्री एस. ए.पाटील , श्री एस. व्ही. खराडे , स. दु. नि. एस. पी. डोईफोडे , पी. बी. देशमुख , जवान नितीन इंदलकर, संतोष निकम , महेश मोहिते, अजित रसाळ, किरण जंगम , विक्रम भोसले यांनी यशस्वीरित्या पार पडली .
सदर गुन्ह्याचा पुढील तपास दुय्यम निरीक्षक श्री बी. एल. पाटील हे करीत आहेत .

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular