साताराः राजधानी महोत्सव हा जनतेचा महोत्सव आहे, या महोत्सवास अनेकांचे सहकार्य लाभत आहे, राजधानी महोत्सवाच्या माध्यमातुन, मराठा साम्राज्याची राजधानी असलेल्या सातार्याची सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण होईल, या महोत्सवात सर्व सातारकर जिल्हावासियांनी सहभागी व्हावे असे आवाहन सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थित माजी जिल्हापरिषद सदस्य बाळासाहेब गोसावी यांच्यासह मान्यवरांच्या शुभहस्ते राजधानी महोत्सवाच्या मंडप व मंचक उभारणीचा शुभारंभ श्रीफळ वाढवून करण्यात आला त्यावेळी खासदार उदयनराजे भोसले बोलत होते. यावेळी जिल्हापरिषदेचे माजी सभापती सुनील काटकर, जिल्हापरिषदेचे माजी उपाध्यक्ष रवि साळुंखे,पंकज चव्हाण डान्स अॅकॅडमीचे संचालक व राजधानी महोत्सवाचे प्रेरणास्त्रोत पंकज चव्हाण, माजी जिल्हापरिषद सदस्य संदिप शिंदे, सातारा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड.अंकुश जाधव, डॉ.शेखर घोरपडे, अॅड.विकास पवार, आदी प्रमुख उपस्थित होते.
खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि पंकज चव्हाण डान्स अॅकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने राजधानी सातारा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवसीय महोत्सवाची सुरुवात शुक्रवार दिनांक 25 मे 2018 रोजी,सकाळी 9.00 वांजता इतिहासकालीन शस्त्रकलेचे प्रदर्शन शिवकालीन खेळांचे प्रदर्शन किल्ले अजिंक्यतारा येथे होणार असून, यावेळी राजमाता श्रीमंत छत्रपती कल्पनाराजे भोसले, शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे गुरुवर्य संभाजी भिंडे गुरुजी, सातारच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल प्रमुख उपस्थित राहणार आहेत. शनिवार दिनांक 26/05/18 रेाजी श्री.छ.शाहू क्रीडा संकुलामध्ये युवागिरी रॉक बॅन्ड शो सायंकाळी 6.00 वांजता आयोजित करण्यात आला आहे.रविवार दिनांक27/05/18 रेाजी सायंकाळी 6.00 वांजता, श्री.छ.शाहू क्रीडा संकूल येथेच राजघराण्याच्या वतीने प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेच्या सातारा गौरव पुरस्कारांचे विविध क्षेत्रातील मान्यवरांना वितरण केले जाणार आहे. या सर्व कार्यक्रमांना सातारकरांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दयावा असे आवाहनही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी केले आहे.दरम्यान दिनांक 24 मे 2018 रोजी श्री.शाहु स्टेडीयम येथे सकाळी 11.00 वांजता, सातारा जिल्हयातील प्रमुख कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक आयोजित केली असून, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या विचारांच्या आणि शिवप्रेमी कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे असे आवाहनही खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी याप्रसंगी केले आहे.
राजधानी महोत्सव मंडप उभारणीचा शुभारंभ
RELATED ARTICLES