सातारा : समाजाची विविध कामे करताना समाजातील विविध कलाकारांना एक स्टेज मिळवुन देत सांस्कृतिक भूक भागवण्याचे कायर्ंही सातारा पालीका या एकांकिका स्पर्धेच्या उपक्रमाने करत आहे. या स्पर्धाचे आयोजन करताना कोणतेही राजकारण आम्ही करत नाही। जास्तीत जास्त लोकांना ही लोककला पहाण्यासाठीॅ आकर्षित करणे हाच आमचा याामागचा उद्देश व प्रामाणिक इच्छा आहे.कलाकरांना संधी देण्याची इच्छा उराशी बाळगुन आम्ही प्रामाणिक प्रयत्न करत आहोत आज ऐतिहासिक वारसा लाभलेल्या या सातारा नगरीला राज्यात या स्पधार्ंमुळे मोठेे स्थान मिळाले आहे असे उद्गार सातारचे खा. श्री. छ. उदयनाराजे भोसले यांनी काढले.
सातारा नगर पालिकेच्या वतीने आयोजीत केेलेल्या माजी नगराध्यक्ष कै. श्री. दादा महाराज करंडक राज्यस्तरिय मराठी एकांकिका स्पर्धेचा उदघाटन सोहळा मोठया उत्साहात आणि विविध मान्यवरांचे उपस्थितीत शाहू कला मंदिरात संपन्न झाला. यावेळी उदयनराजेंनी वरील उद्गार काढले.
या उदघाटन समारंभास नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष सुहास राजे शिर्के, स्पर्धेच्या कार्याध्यक्ष सुजााता राजेमहाडिक, कायर्ंवाह कल्याण राक्षे , स्मीता घोडके, स्पर्धेचे परीक्षक हेमांगी जोशी, वामन पंडीत सुरेश हळदीकर यांचेसह विविध समित्यांचे सभापती आणि नगरसेवक यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांचे हस्ते दिप प्रज्वलन आणि नटराजाचे पुजन करुन या स्पर्धेचा उदघाटन समारंभ सुरु झाला.यावेळी सातारच्या कलाकाराच्या हस्तेच या स्पर्धेचा नारळ फुटावा ही इच्छा खरी करुन दाखवत उदयनराजे यांनी हा मान बाळासाहेब उर्फ कल्याण राक्षे यांना देत स्पर्धेचा नारळ फोडायला लावला. त्यानंतर सर्व मान्यवरांचे सत्कार पालीकेेच्या वतीने करण्यात आले यावेळी प्रास्तविक करताना कल्याण राक्षे म्हणाले की,गेली 3 वर्षे या स्पर्धा सुरु असून पालीकेने एक सामाजिक बांधिलकी आणि सातारच्या नाट्य आणि सांस्कृतिक चळवळीला चालना देणारा हा उपक्रम सुरु केला. यातून उद्याचेे भावी यशस्वी कलाकार निर्माण होत रहातील व त्यांचे साठी या स्पर्धां या एक चंागले माध्यम असणार आहेत.
यावर्षी तब्बल 55 संघ संपुर्णं राज्यातु सह़भागी झाले असून आता पुढील 3 दिवस ते सर्वजण आपली कला सादर करणार आहेत. समारंभात.. रंगवाचा.. या नियतकालीकाचे प्रकाशन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.
या वेळी सातारा येथील विविध नाट्य कर्मींचा सत्कार उदयनराजे भोसले तसेच प्रमुख मान्यवरांचे हस्ते करण्यात आला. यामध्ये शरद व सौ.संध्या लिमये, रविंद्रडांगे, मोहन बेदरकर, रुक्मीणी सुतार, शरद वामळे, पळशीची पी. टी. उषा या टीमचे सर्व कलाकार यांचा समावेश होता.
यावेळी सातारा येथील कलकारांना पालीकेतर्फे लवकरच रंगीत तालीमीसाठी जागा उपलब्ध करुन दिली जाईल कारण या स्पर्धा म्हणजे खरोखरच कलाकारांची खाण असून या स्पर्धेने अनेक दिग्गज कलाकारांना निर्माण केेले या स्पर्धा अश्याच बहरत जावो अश्या शब्दात सौ. सुजाता राजेमहाडिक यांनी आपले मनोगत केले.
नगराध्यक्षा सौ. माधवी कदम यांनी या एकांकिका स्पर्धा सातारच्या संास्कृतिक क्षेतात भर घालणारा हा उपक्रम असाच वाढत जाईल असा विश्वास वाटतो असे आपल्या मनोगतात सांगितले.
आपल्या भाषणात बोलताना उदयनराजे भोसले म्हणाले की,या स्पर्धा म्हणजे खर्या अर्थाने दादामहाराजांना श्रध्दांजली आहे. स्वत: दादामहाराज एक चांगले कलाकार होते व त्यांना विविध कलांची जाण व आवड होती. अनेकांना त्यांनी कलेसाठी उत्तेजीत व प्रोत्साहीत करुन मदत केली. अनेक दिग्गज कलाकार सातारा येथे घडले व घडत आहेत. कलेच्या माध्यमातून उंची गाठता येेते व ही उंची साातारा शहराला मिळवून देणार्या व्यक्तंीचे कौतुक आज येेथे होत आहे. या कलेत रिटेक नाही त्यामुळे ही स्पर्धां अशीच उंची गाठो.
आज येथे येताना स्टजवर खिळे निघालेले पहायला मिळाले. मी पालीकेच्या अधिकार्यांना आता सांगतो की कलाकारांना काणेताही त्रास होउ देउ नका. आजपयर्ंंतज्याच्या हातात सत्ता होती त्यांनी केवळ ओरबडून खायचेे तेवढेच काम केले. पुढील वर्षी येथे याल त्यावेळी असा प्रकार आपणाला पहायला मिळणार नाही. असेच आपले सहकार्यं व आशिर्वाद आमचे वर कायम राहू दयात व या स्पर्धांची उंची अशीच बहरत जावो.
आभार प्रदर्शन उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी केेले, तर या कार्यंक्रमाचे सुत्र संचालन संयोगिता माजगावकर जोशी यांनी केले. यावेळी नगरसेविका लता पवार, सुमती खुटाळे, यशोधन नारकर, स्नेहा नलावडेे, स्मीता घेाडके, सविता पवार, रजनी जेधे, किशोर शिंदे, विशाल जाधव, अली शेख, राजु भोसले तसेच पालीकेच्या विवध विभघगाचे अधिकारी कर्मचारी व नाट्यरसिक मोटृया संख्येने उपिसथ्त होते.
उद्घाटन समारंभानंतर सातारा येथील राधघक्ष्णची इच्चा , तसेच मॅड मुव्हीजची अजबगजब , निर्मिती संस्थेची म्युटेशन व शो स्टॉपर्सची दि फिअर फॅक्टर या एकांकिका सादर करण्यात आल्या.तर उद्घाटन सोहळ्यपूर्वी चिंगी, यज्ञाहूती व सक्षम कोल्हापुर यांची व्हॅलेंटाईन डे या एकंाकिका सादर करण्यात आल्या.
या स्पर्धा रवीवार दि. 27 पयर्ंंत सुरु रहाणार असून अनेक दिग्गज कलाकारंाच्या कलाकृती या मध्ये सादर होणार आहेत. समांरभास विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.