Thursday, April 24, 2025
Homeकृषीराजधानी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे मंडप उभारणीचा शुभारंभ

राजधानी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे मंडप उभारणीचा शुभारंभ

कडधान्य, तांदूळ महोत्सव ; 1 टन वजनाची गाडी ओढणारा कुत्रा, दीडशे किलोचा बोकड प्रदर्शनाचे विशेष आकर्षण
साताराः जिल्ह्याचे लाडके खासदार श्री.छ.उदयनराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व सातारच्या नगराध्यक्षा माधवी कदम यांच्या संकल्पनेतून सैनिक स्कुल मैदान सातारा येथे दि. 23फेब्रुवारी  ते 27 फेब्रुवारी दरम्यान  दुसरे राज्यस्तरीय कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. स्मार्ट एक्स्पो ग्रुप तसेच महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ नगराध्यक्षा सौ. माधवी कदम व सैनिक स्कुलचे रजिस्ट्रार कर्नल रणजीत नलावडे यांचे हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.याप्रसंगी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के,माजी उपनगराध्यक्ष राजू भोसले,निशांत पाटील,ज्येष्ठ अस्थिरोगतज्ञ डॉ.संजोग कदम,सभापती यशोधन नारकर,अली शेख,अ‍ॅड.दत्तात्रय बनकर, ,किशोर शिंदे ,श्रीकांत आंबेकर, स्मार्ट एक्स्पोचे सोमनाथ शेटे,विठ्ठल जाधव, तालुका कृषि अधिकारी श्री.कांबळे,मनोज शेंडे,सौ.स्मीता घेाडके, सौ.सुजाता राजेमहाडिक, सौ. स्नेहा नलावडे, सविता फाळके आदी मान्यवर उपस्थित होते.या प्रदर्शनाचे यशस्वी संयोजनासाठी गौरव जाधव,इंद्रजीत कदम व त्यांचे सहकारी परिश्रम घेत आहेत.
सातारा शहरामध्ये यावर्षी प्रदर्शनाचे दुसरे वर्ष असून  शेतकर्‍यांना केंद्रबिंदू मानून त्यांच्यासाठीच हे  कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या छताखाली बि-बियाणे, शेती अवजारे,ट्रॅक्टर्स, ठिबक सिंचन, रोपवाटिका, खते औषधे, शेतीविषयक पुस्तके, फळ उत्पादन, सौरउर्जा उपकरणे पाहण्याची सुवर्णसंधी यानिमित्ताने उपलब्ध होणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या विविध शासकीय योजनांची माहिती देणारी दालने उभारण्यात येणार आहेत. प्रथमच देशी बियाण्यंाचे प्रदर्शन व विक्रीसाठी स्वतंत्र दालन या प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आले आहे. ज्या शेतकर्‍यांकडे देशी बियाणे उपलब्ध असतील त्यांना मोफत दालन देण्याची व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली आहे.
शहरातील लोकांसाठी राजधानी कृषी प्रदर्शनामध्ये कडधान्य महोत्सव व तांदूळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सातारा येथे शेतकरी बाजार प्रदर्शनामध्ये भरवण्यात येणार आहे. यामध्ये शेतकरी त्यांचा शेतीमाल रिटेल किमतीमध्ये थेट ग्राहकांना विक्री करू शकतो. त्यासाठी मोफत स्टॉलची सोय करण्यात आली आहे. या प्रदर्शनामध्ये ऊस पीक स्पर्धा, भाजीपाला स्पर्धा, द्राक्षे स्पर्धा, बेदाणे स्पर्धा यांचे आयोजन केले आहे. तरी शेतकरी बांधवांनी त्यांच्या शेतीमालाचे नमुने स्पर्धासाठी प्रदर्शनामध्ये घेवून येण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
आयोजित केलेल्या या प्रदर्शनात देशातील नामवंत कंपन्यांचे 300 हून अधिक स्टॉलचा सहभाग राहणार आहे. सकाळी 10 ते रात्री 10 या वेळेत आयोजित केलेल्या या प्रदर्शनात  यामध्ये शेतीविषयक प्रक्रिया उद्योग, महाराष्ट्र शासन कृषी विभाग्याच्या,शेतकर्‍यांसाठीच्या सर्व योजनांची माहिती देणारी दालने, पशु पक्षी प्रदर्शन, डॉग शो, दुर्मिळ देशी 500 हुन बियाण्यांचे  प्रदर्शन व विक्री, तांदूळ महोत्सव, परदेशी भाजीपाला प्रदर्शन, शेतीविषयक पुस्तक प्रदर्शन, 3 लाखाहून अधिक शेतकरी बांधवांची प्रदर्शनास भेट, तज्ञ मान्यवरांची व्याख्याने, नवीन तंत्रज्ञान, पिक स्पर्धा, राजधानी कृषी पुरस्कार, सौर ऊर्जा विषयक दालने, खास आकर्षण,भारतातील सर्वांत मोठा,, 150 किलोचा पंजाबी बोकड ,पाहण्याची सुवर्णसंधी, जगातील सर्वात लांब 15 इंच लांब गव्हाची लोम्बी व 140 ते 150 दाणे तयार होणारी कुदरत 100 व 8 इंच लांबीची  लोम्बी कुदरत 17 ही देशी बियाणे…चे माहिती व प्रदर्शन, सेंद्रीय शेती साठी विशेष मार्गदर्शन देणारी दालने, गोड्या पाण्यात मोत्यांची शेती संदर्भात माहीती, शेतकर्‍यांना त्यांच्या शेतीमाल/ बियाणे विक्रीसाठी मोफत  स्टॉल, जगातील सर्वांत लांब 1फूट लांबीची देशी मिरची, खास आकर्षण एक टन वजनाची गाडी ओढणारा जगातील सर्वात आक्रमक श्वान.व गाडी ओढण्याचे प्रात्यक्षिक, फळे व फुले प्रदर्शन व स्पर्धा, गाई ,म्हैशी व बैल प्रदर्शन व स्पर्धा, माकड पळवून लावणारे लहान यंत्र, सर्प विषयक माहीती देणारे चित्र प्रदर्शन, देशी गायीच्या गोमूत्रा पासून 20 रु.पासून 20000 लिटर पर्यंतच्या घरच्या घाटी औषध बनविण्याची प्रक्रिया उद्योगाची माहिती, शेतीविषयक पुस्तक प्रदर्शन आदीचा सहभाग असणार आहे.या प्रदर्शनात   दि. 25 फेब्रुवारी रोजी भव्य डॉग शोचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच 1 टन वजनाची गाडी ओढणारा कुत्रा व दीडशे किलोचा बोकड हे या प्रदर्शनाचे विशेष आकर्षण राहणार आहेत. हे प्रदर्शन मागील वर्षी प्रमाणेच या ही वर्षी सातारा जिल्हा वासियांची विक्रमी गर्दी खेचणारे ठरेल असे सोमनाथ शेटे यांनी सांगितले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular