Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीराजेंद्रकुमार काकडे यांचा उद्योगरत्न पुरस्काराने बारामती येथे गौरव

राजेंद्रकुमार काकडे यांचा उद्योगरत्न पुरस्काराने बारामती येथे गौरव

सातारा : येथील उद्योजक व जीवनधारा संस्थासमूहाचे संस्थापक राजेंद्रकुमार काकडे यांना बारामती येथे नुकतेच नीळकंठेश्‍वर कल्याणी उद्योगरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. अखिल मराठी साहित्य, सांस्कृतिक कला व आरोग्यदायी विकास परिषदेतर्फे खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीत आयोजित मराठी साहित्यीक संमेलनात श्री. काकडे यांना जि. प. सदस्य रोहितदादा पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अखिल मराठी साहित्य विकास परिषदेचे संस्थापक बी. डी. गायकवाड, प्रदेशाध्यक्ष बा. ह. मगदूम, दत्तात्रेय ठोकळे, सौ. कल्पना जोशी यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान सोहळा झाला.
उद्योजक राजेंद्रकुमार काकडे हे जीवनधारा संस्थासमूहाच्या माध्यमातून समाजकार्यात सक्रिय आहेत. याशिवाय जीवनधारा उद्योगसमूहातर्फे पवनउर्जा क्षेत्रात वीजनिर्मिती आणि अनेकांना रोजगारसंधी मिळवून देण्याचे कार्य केले आहे. याशिवाय वाणिज्य, अर्थकारण आणि सहकार क्षेत्रातही उल्लेखनिय कार्य केले आहे. त्यांच्या या सर्व कार्याची दखल घेवुन या पुरस्काराने काकडे यांचा गौरव करण्यात आला. विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान सोहळा झाला. या पुरस्काराबद्दल विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular