Sunday, June 22, 2025
Homeताज्या घडामोडीफलटण येथे राजमाता जिजाऊ माँसाहेब जयंती विविध उपक्रमांनी साजरी

फलटण येथे राजमाता जिजाऊ माँसाहेब जयंती विविध उपक्रमांनी साजरी

फलटण: श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या संकल्पनेतून श्रीमंत मालोजीराजे स्मृती प्रतिष्ठान, फलटण यांच्या वतीने राजमाता जिजाऊ माँसाहेब, यांच्या 421 व्या जंयती निमित्त विविध उपक्रमांनी साजरी करण्यात आली.
शनिवार दिनांक 12 जानेवारी 2019 रोजी सायं 7 वाजता महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज, श्रीमंत छत्रपती महाराणी सईबाई महाराज, श्रीमंत छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीने पावन झालेल्या ऐतिहासिक मुधोजी मनमोहन राजवाडा, फलटण येथे विश्वजीत तावरे लिखित साक्षात जिजाऊ, सादरकर्त्या – गौरी थोरात (संगमनेर) व शिवसिंहाचा छावा – शंभूराजे, सादरकर्ते – वैभव चव्हाण (बारामती) यांनी एकपात्री नाट्यप्रयोग सादर केले.
या कार्यक्रमास विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आ. दिपकराव चव्हाण, प्रसिद्ध शिवचरित्र अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन फलटण श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, जि.प.अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, जि.प.सदस्या श्रीमंत शिवांजलीराजे संजीवराजे नाईक निंबाळकर, सदस्या, नगराध्यक्षा निताताई मिलिंद नेवसे, विश्वासराव देशमुख, पं.स. सदस्य श्रीमंत विश्वजीतराजे रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत अजयसिंहराजे संजीवराजे नाईक निंबाळकर इत्यादी मान्यवरांच्यासह श्रीमंत मालोजीराजे स्मृती प्रतिष्ठान पदाधिकारी, विविध संस्था पदाधिकारी, अधिकारी, महिला, पत्रकार इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन प्रा.डॉ.अशोक शिंदे यांनी केले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular