Friday, June 20, 2025
Homeताज्या घडामोडीरमेश चव्हाण यांना ग्रंथश्रेष्ठता पुरस्कार जाहीर

रमेश चव्हाण यांना ग्रंथश्रेष्ठता पुरस्कार जाहीर

साताराः रा. ना. चव्हाण प्रतिष्ठान, वाईचे विश्वस्त व रा. ना. चव्हाण वाङ्मयाचे संपादक श्री. रमेश चव्हाण यांनी संपादित केलेल्या रा. ना. चव्हाण यांच्या लेखसंकलनाच्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे : एक दर्शन (भाग 1 व 2) या ग्रंथांना स्नेहवर्धन रिसर्च इन्स्टिट्यूट, पुणे तर्फे 2018 वर्षासाठीचा ङ्गग्रंथश्रेष्ठता पुरस्कारफ जाहीर करण्यात आला.
या पुरस्कारास प्रा. रा. ग. जाधव ङ्गसमीक्षामित्र पुरस्कारफ असे संबोधले जाते. स्नेहवर्धन इन्स्टिट्यूटच्या संचालक डॉ. स्नेहल तावरे यांनी हा पुरस्कार पुण्यात जाहीर केला.
पुरस्कार वितरण समारंभ डॉ. पंडित विद्यासागर, ज्ञानेश्वर तापकीर आणि डॉ. न. म. जोशी यांच्या हस्ते, येत्या गुरुवारी (25 एप्रिल 2019) रोजी सायंकाळी 6 वाजता टिळक रस्त्यावरील मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स येथे होईल.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular