Saturday, June 21, 2025
Homeताज्या घडामोडी23 वा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार प्रा. डॉ. श्रीधर मधुकर उपाख्य...

23 वा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार प्रा. डॉ. श्रीधर मधुकर उपाख्य राजा दीक्षित यांना जाहीर

सातारा : रा.ना.चव्हाण प्रतिष्ठान, वाई यांच्यावतीने देण्यात येणारा 23 वा महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार पुणे येथील सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाच्या आंतरप्रणाली अभ्यासकेंद्राचे माजी विभागप्रमुख व नवी दिल्ली येथील भारतीय इतिहास अनुसंधान परिषदेचे सदस्यस यावर्षी प्रा. डॉ. श्रीधर मधुकर उपाख्य राजा दीक्षित यांना जाहीर करण्यात येत असल्याची माहिती प्रतिष्ठानचे ज्येष्ठ विश्वस्त आणि सामाजिक कार्यकर्ते,दलितमित्र संभाजीराव पाटणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.यावेळी रा.ना. चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष व विश्वस्त रवींद्र चव्हाण, सतीश कुलकर्णी, रमेश चव्हाण, शरद चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते.
या पुरस्काराचे वितरण रा.ना. चव्हाण यांच्या 26 व्या स्मृतीदिनी म्हणजे 10 एप्रिल 2019 रोजी ब्राह्मसमाज रविवार पेठ,वाई येथे सकाळी 9.30 वाजता ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व विचारवंत डॉ.बाबा आढाव यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत व समीक्षक डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते प्रदान केला जाणार आहे. दलितमित्र रा.ना.चव्हाण यांनी ज्यांच्या प्रेरणेने आपले प्रबोधनपर साहित्य समृध्द व समर्थ केले त्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो.हा पुरस्कार सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात,संशोधन क्षेत्रात व साहित्यिक क्षेत्रात भरीव कामगिरी व कार्य करणार्‍या व्यक्तीस दरवर्षी सन्मानपूर्वक दिला जातो.यंदाचा हा 23 वा पुरस्कार प्रतिष्ठानच्या विश्वस्तांनी प्रा. डॉ. श्रीधर मधुकर उपाख्य राजा दीक्षित यांना देण्याचे निश्चित केले आहे.स्मृतीचिन्ह, शाल व श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
महर्षी शिंदे पुरस्कार हा दरवर्षी वाई येथे रा.ना.चव्हाण प्रतिष्ठान, सातारा येथील बॅरिस्टर पी.जी.पाटील सार्वजनिक वाचनालय, तेजस्वीनी केटरर्स उद्योग समुह, महाराणी ताराबाई महिला सहकारी पतसंस्था,ब्राम्हो समाज वाई,व शिवाजी वाचनालय,वाई यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येतो.
यापूर्वी हा पुरस्कार डॉ.सरोजिनी बाबर,हरी नरके,डॉ. सदानंद मोरे,डॉ.आ.ह.साळुंखे,डॉ.राम ताकवले, डॉ.मा.प. मंगुडकर, डॉ.जयसिंगराव पवार, रा.कृ. कणबरकर,डॉ.द.ता.भोसले, डॉ.गो.मा. पवार, डॉ.गंगाधर पानतावणे, प्रा.डॉ.एन.डी. पाटील, डॉ.जनार्दन वाघमारे, डॉ.भा.ल.भोळे,डॉ.बी.पी.ऊर्फ बाबासाहेब बंडकर, डॉ.नागनाथ कोतापल्ले, प्रा.पुष्पा भावे, कॉ.शरद पाटील,डॉ.गेल ऑम्व्हेट ,डॉ.शमशुद्दीन तांबोळी व प्रा.डॉ. अशोक चौसाळकर संपादक अ‍ॅड.र.वि.तथा राजाभाउ पाटील यांना देण्यात आला आहे. या पुरस्कार सोहळयास सर्वानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी या वेळी केले. पुरस्कार वितरणच्या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून मा.डॉ.नागनाथ कोतापल्ले,प्रा. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे,ज्येष्ठ साहित्यिक सतिश भावसार हे उपस्थित राहणार आहेत. तसेच या रमेश चव्हाण संपादित रा.ना.चव्हाणांच्या लेखसंग्रहातील … आधुनिक भारतातील प्रबोधन या 3.87 व्या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांच्याहस्ते होणार आहे. तसेच या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य शासनाचा मराठी भाषेतील उत्कृष्ट वाडमय निर्मिती (संपादित) दलितमित्र रा.ना.चव्हाण पुरस्कार प्राप्त साहित्यिक सतिश भावसार यांना त्यांच्या .निवडक बाबुराव अर्नाळकर या संपादिक पुस्तकासाठी नुकताच प्रदान करण्यात आला त्याबद्दल त्यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. या पुरस्कार सोहळयास सर्वानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजकांनी या वेळी केले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular