महाबळेश्वर ः गेली अनेक वर्षे रखडलेल्या राष्ट्रवादी कॉग्रेसच्या शहर पदाधिकारी यांच्या निवडी आ. मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राष्ट्रवादी कॉगेे्रस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात अखेर जाहीर करण्यात आल्या. या मध्ये राष्ट्रवादी कॉग्रेसच्या शहर अध्यक्षपदी महाबळेश्वर अर्बन बॅकेचे माजी अध्यक्ष व विदयमान संचालक दत्ताजी वाडकर यांची निवड जाहीर करण्यात आली. या निवडीमुळे आता शहर राष्ट्रवादी कॉग्रेसला सुगीचे दिवस येतील असा दावा पक्षातुन व्यक्त करण्यात येत आहे.
गेली अनेक वर्षे राष्ट्रवादी कॉग्रेसच्या शहर पदाधिकारी यांच्या निवडी रखडलेल्या होत्या. या निवडी रखडल्यामुळे राष्ट्रवादी कॉग्रेसच्या पक्षाच्या शहरातील कार्यकर्त्यां मध्ये मरगळ आली होती. आ. मकरंद पाटील यांनी पालिकेतील गलिच्छ राजकारणामुळे शहराकडे पाठ फिरविली होती. परंतु लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पक्षातील कार्यकर्त्यां मधील मरगळ झटकुन त्यांना कामाला लावण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे रखडलेल्या निवडी जाहीर करण्याचा निर्णय घेतला. येथील निता हॉटेलच्या सभागृहात निवडणुकीच्या प्रचारासाठी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास आ मकरंद पाटील यांच्यासह बाळासाहेब भिलारे, जिल्हा बॅकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, उप नगराध्यक्ष अफजल सुतार, माजी नगराध्यक्ष किसनराव शिंदे, युसूफ शेख, नगरसेवक संदीप साळुंखे, सुनिल शिंदे, विशाल तोष्णीवाल, समीर सुतार आदी मान्यवर उपस्थित होते.
शहरात दत्ताजी वाडकर यांचेकडे उत्कृष्ठ संघटन कौशल्य आहे कार्यकत्यार्ंची मोठी फळी वाडकर यांच्या मागे आहे. तसेच पक्षाचे कार्यक्रमात ते हिरीरीने भाग घेतात त्यामुळे शहर अध्यक्ष पदासाठी त्यांचे नाव आघाडीवर होते अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादी कॉग्रेसच्या अध्यक्षपदासाठी त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. तेव्हा उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी व पदाधिकारी यांनी जोरदार टाळयांच्या गजरात त्यांच्या नावाचे स्वागत केले. पदाधिकारी यांनी दिलेला प्रतिसाद पाहुन अ. मकरंद पाटील यांनी समाधान व्यक्त केेले. वाडकर यांना पक्षाच्या कामासाठी मदत व्हावी या साठी चार उपाध्यक्षांची निवड केली. यामध्ये प्रविण मानकुंबरे, जावेद वलगे, गजानन फळणे व अमजद पटेल यांची निवड केली. राष्ट्रवादी युवक कॉग्रेसच्या शहर अध्यक्षपदीची धुरा माजी नगराध्यक्ष बबनराव ढेबे यांचे चिरंजीव व युवानेते रोहीत ढेबे यांचेवर सोपविण्यात आली. या मेळाव्यात बोलताना आ. मकरंद पाटील यांनी नविन पदाधिकारी यांना जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले. शहरातुन आपल्याला जास्तीत जास्त मतदान कसे होईल त्याकडे नविन पदाधिकारी यांनी लक्ष दिले पाहीजे अशी अपेक्षाही आ. पाटील यांनी व्यक्त केली. यावेळी प्रविण भिलारे, संजय मोरे, डॉ. प्रमोद शेलार, सुभाष कारंडे, सुभाष सोंडकर, अॅड. संजय जंगम, दिपक कांदळकर, जीवन महाबळेश्वरकर, किसन खामकर, बैतुल्लाह शेख, मुबारक शेख, कासम वारूणकर ,मुबारक वारूणकर, रियाज डांगे, गणेश ढेबे आदी मान्यवर उपस्थित होते.
राष्ट्रवादी कॉग्रेस शहर अध्यक्षपदी दत्ताजी वाडकर यांची निवड
RELATED ARTICLES