Thursday, June 26, 2025
Homeताज्या घडामोडीनवीन वाहनांवर रजिस्ट्रेशन, नंबर प्लेट गाडीवर बसविणे सक्तीचे

नवीन वाहनांवर रजिस्ट्रेशन, नंबर प्लेट गाडीवर बसविणे सक्तीचे

साताराः भारत सरकार महामार्ग व परिवहन मंत्रालय यांनी वाहनाची चोरी शोधणे व हरवलेले वाहन शोधणे याबाबत नोटीफिकेशन केले आहे. 1 एप्रिल 2019 नंतर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट वाहन निर्मिती किंवा विक्री करणार्‍या संस्थेने आरटीओ कार्यालयामधील रजिस्ट्रेशन क्रमांक, नंबर प्लेट, गाडीवर बसवूनच ग्राहकास देणे सक्तीचे केले आहे.
15 वर्षात नंबर प्लेट खराब झाल्यास दुसरी नंबर प्लेट संबंधितांनी बनवून देणे सक्तीचे आहे. सदरची नंबर प्लेट क्रोमिअम बेसड होलोग्राम हॉट स्टॅम्पड प्रकारची असून वाहनाच्या पुढे व मागे डाव्या बाजूस बसविण्यात येईल. सदर नंबर प्लेटवर निळया रंगात अशोकचक्र असेल. तसेच 10 अंकी कायम स्वरूपी परमनंट आयडेंटी फिकेशन नंबर याशिवाय तिसरी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट क्रोमीअम होलोग्राम स्टिकर्स हा खालील डाव्या बाजूस विंड सिल्ड/ काचेवर असेल. यामध्ये आरटीओ ऑफीस, नाव, पत्ता नंबर, रजिस्ट्रेशन नंबर इत्यादी संपूर्ण माहिती असेल.
सदरची नंबर प्लेट अशाप्रकारची असेल की, सहजासहजी बदलता येणार नाही. डुप्लीकेट तयार करता येणार नाही. अर्थातच या प्रणालीमुळे किडनॅपीग करणे, वाहन चोरून नेणे, चेन स्नॅचिंगसाठी वापरली जाणारी दुचाकी वाहने, गैरकृत्य करण्यासाठी वाहन वापरणे यास आळा बसेल व चोरलेले वाहन तत्परतेने शोधून काढणेही शक्य होणार आहे. जनहितार्थ व शासन माहितीसाठी संबंधित उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व मोटार वाहन, डिलर्स, विक्रेते यांची मिटींग घेवून त्यांना या सुधारित नंबर प्लेटबाबत माहिती उपलब्ध करून देणे आवश्यक आहे अशी माहिती वाहतूक मित्र मधूकर शेंबडे यांनी दिली आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular