Thursday, June 19, 2025
Homeठळक घडामोडीसोनगांव तर्फ सातारा गावच्या हद्दीत दुचाकीच्या अपघातात एक ठार

सोनगांव तर्फ सातारा गावच्या हद्दीत दुचाकीच्या अपघातात एक ठार

साताराः सोनगांव तर्फ सातारा गावच्या हद्दीत सातारा पॉलिटेक्निक कॉलेजजवळ धबधब्याच्या ओढयावरील पुलावरून बजाज दुचाकी ताबा सुटून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीचा ठार झाला आहे.
याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, बजाज दुचाकी क्रं. एम.एच.11 एवाय 9884 वरील स्वार शिवाजी दगडू साळुंखे (वय 27) रा. अजरापूर ता. फलटण हा युवक शुक्रवारी मध्यरात्री सोनगांव तर्फ सातारा गावच्या हद्दीत सातारा पॉलिटेक्निक कॉलेजजवळील रस्त्यावरून खिंडवाडीच्या दिशेने येत असताना धबधब्याच्या ओढयावरील पुलाजवळ त्याचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी खडयात कोसळून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार शिवाजी साळुंखे यांच्या डोक्यास गंभीर इजा झाल्याने रक्तस्त्राव होवून जागीच मृत्यू झाला. याची खबर सातारा तालुका पोलीस ठाण्यात सकाळी 7.15 वा. मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून अपघात स्थळांचा पंचनामा करून दुचाकी व मृतदेह ताब्यात घेतला. यानंतर क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण जिल्हा रूग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यावर मात्र मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देेण्यात आला. दरम्यान, अपघातातील मृत शिवाजी साळुंखे हा हॉटेलमध्ये नोकरी करत होता, तसेच त्याने मालगाव ता. सातारा येथील आपल्या मित्राची बजाज दुचाकी गुरूवारी घेवून गेला होता, अशी माहिती पोलीस सुत्रांनी दिली आहे. मद्यपान केल्यामुळे दुचाकीस्वार साळुंखे यांचा अपघात झाला असावा, अशी चर्चा परिसरात सुरू आहे. या अपघाताचा तपास पो. हवालदार मोरे करीत आहेत.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular