सातारा : लिंब ता सातारा येथील नागेवाडी फाटा येथे 407 टेम्पोने दोन दुचाकींना धडक दिल्याने पॉलिटेक्निकची विद्यार्थींनीचा जागीच मृत्य झाला आहे तर अपघातात आणखी एका मुलीसह दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार लिंब येथील बारा मोटेची विहीर पाहून सातारकडे येत असताना लिंब दिशेने निघालेल्या 407 या टेम्पो (चक 08 क 6361) ने दोन दुचाकिना समोरून जोरदार धड़क दिली. या धडकेत ( चक 11 इइ 0658) या दुचाकिवरील स्मिता दीपक आडसुळ (मु.रा.लालगुण ता खटाव सध्या रा. सातारा येथील हॉस्टेल) या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यु झाला तर प्रशांत जाधव व तेजल पाटील हे दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत जखमीना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती सातारा येथील एका महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना व महाविद्यालय प्रशासनाला समजताच त्यांनी जिल्हा रुग्णालयात मोठी गर्दी केली होती.
जखमी असलेल्या एकाचा वाढदिवस असल्याने तो साजरा करण्यासाठी हे सर्वजन कॉलेज ला दांडी मारून कॉलेजपासून 8 की मी अंतरावर असलेल्या ऐतिहासिक बारा मोटेची विहीर येथे गेले होते अशी चर्चा काही विद्याथ्यामध्ये दबक्या आवाजात सुरु होती

