सातारा : सज्जनगडावर गुरुवारी पहाटे गडावरील ग्रामदेवी असलेली अंगलाई देवी मंदिरात कुलुप तोडून चोरीचा प्रयत्न करण्यात आला. प्रथमदर्शनी मात्र कोणताही ऐवज चोरी झाला नसल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मछले करीत आहेत.
घटना स्थळावरून समजलेली माहिती अशी की, नेहमीप्रमाणे गुरुवारी पहाटे पाच वाजता अंगलाई मंदीर उघडण्यात आले. मंदीर उघडुन पुजारी मुख्य मंदिरात गेले. परत सहा वाजता पूजा करायला आल्यावर मंदीरातील गाभ्यार्याचा दरवाजा उघडा दिसला. पाहणी केली असता कुलुप तोडलेले दिसले. ही बाब त्यांनी समर्थ रामदास स्वामी संस्थानमध्ये कळवली. पाहणी केल्यावर मंदिरातील पूजेचे साहित्य विस्कटले होते. देवीच्या साड्या नव्हत्या. गाभाराही विस्कटला होता. चोरी ची घटना समजताच ग्रामस्थ, भाविकांची गर्दी वाढली होती.
सदर घटनेची पोलीस स्टेशनला नंद झाली आहे. सज्जनगडावर दररोज हजारो भाविक येत असतात. मात्र त्यांच्या सुरक्षेसाठी कोणतीच उपाय योजना नसते. वाहनतळावरून पेट्रोल चोरी, वाहन पार्किंग वरून नेहमीच वादावादी होत असते. छोट्या चोर्याच्या घटनांही होत असतात. त्यामुळे सज्जनगडावर कायम स्वरुपी पोलीस चौकी सुरू करण्याची मागणी नागरिक करू लागले आहेत.
सज्जनगडावरील अंगलाई मंदिरात चोरीचा प्रयत्न
RELATED ARTICLES