Saturday, June 21, 2025
Homeठळक घडामोडीमोबाईल शॉपी फोडून हॅन्डसेट लंपास ; चोरट्यांचा दानपेटीवरही डल्ला

मोबाईल शॉपी फोडून हॅन्डसेट लंपास ; चोरट्यांचा दानपेटीवरही डल्ला

सातारा  : सातारा शहरातील गुरुवार पेठेतील पवार टॉवर मधील तळमजल्यावरील सेलवन मोबाईल शॉपीचे शटर्स शुक्रवारी रात्री अज्ञात चोरट्यानी उचकटून आत प्रवेश करुन 5 हजार 500 रुपयांचे 5 मोबाईल हॅन्डसेट लंपास केले आहेत. तसेच एका दानपेटीवरही चोरट्यांनी डल्ला मारला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, सातारा शहरतील गुरुवार पेठेतील पवार टॉवरमध्ये तळमजल्यावर मुनाफ शेख रा. गुरुवार पेठ सातारा यांच्या स्वत:च्या मालकीचे सेलवन मोबाईल शॉपीचे दुकान आहे. शुक्रवारी रात्री त्यांनी आपली मोबाईल शॉपीला कुलूप लावून घरी गेले होते, त्याच रात्री चोरट्यांनी कटावणीने दुकानाचे शटर उचकटून व कलूप फोडून आत प्रवेश केला. नवीन तीन व जुने दुरुस्तीसाठी आलेले 2 असे एकूण 5 मोबाईल हॅन्डसेट असा 5 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. शेख यांनी दुकानात ठेवलेली दान पेटीही चोरट्यांनी हातोहात लंपास केली.
आज घटनास्थळावर सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सारंगकर, सहाय्यक फौजदार आर. के. पवार, शेख यांनी भेट देवून पहाणी करुन चोरीच्या तपासाबाबत दिशा ठरविण्यात आली. सायंकाळी उशीरा या चोरीची नोंद शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.
Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular