साताराः 21 व्या मिनी अॅथलेटीक्स स्पर्धेच्या उदघाटनप्रसंगी कराड तालुक्यातून आलेल्या 1200 खेळाडूंच्या साक्षीने कराड अर्बंन बँकेचे उपाध्यक्ष समीर जोशी आणि डॉ.द.शि.एरम मुक बधीर विद्यालयाचे सचिव डॉ. चिन्मय एरम यांचे हस्ते सन्मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. यावेळी कु. स्नेहाचे आई-वडिल उपस्थित होते त्यांचाही यथोचित सत्कार करण्यात आला. वेणूताई चव्हाण कॉलेजची विद्यार्थीनी व अर्बन स्पोर्टस क्लबची आंतरराष्ट्रीय खेळाडू व हिने आतापर्यंत दोन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चांगली कामगिरी केली असून पुढील स्पर्धेची तयारी करत आहे. यावेळी शालेय राज्य स्पर्धा विजेता आणि आत्माराम विद्यामंदीर ओगलेवाडीचा विद्यार्थी शिवम जाधव आणि श्रुती जाधव व केशवराव पवार इंग्लिश मेडीयमची विद्यार्थीनी यांचा त्यांच्या आई-वडीलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कराड अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव, अध्यक्ष सुभाष एरम, व कुटुंब प्रमुख सुभाष जोशी यांनी विजेत्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. तसेच कराड अर्बन स्पोर्टस् क्लबचे मार्गदर्शक व सचिव जगदीश त्रिवेदी स्पोर्टस् क्लबचे अध्यक्ष व प्रशिक्षक दिलीप चिंचकर उपस्थित होते.
खेलो इंडिया स्पर्धेत रौप्य पदक विजेत्या स्नेहा जाधवचा भव्य सत्कार
RELATED ARTICLES