Thursday, June 19, 2025
Homeठळक घडामोडीरोटरी क्लब ऑफ सातारा 7 हिल्स तर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन

रोटरी क्लब ऑफ सातारा 7 हिल्स तर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन

सातारा : रोटरी क्लब ऑफ सातारा ७ हिल्सआणि क्रांतिसिह नाना पाटील जिल्हा रुग्णालय ( सिव्हिल हॉस्पिटल ) यांचे संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन रविवार दि. ३० जुलै रोजी सकाळी ९.३० ते दु २:०० या वेळेत ढाणेज इनोव्हेंट एकेडमी, शाहू चौक, नगरपालिके जवळ सातारा येथे केले आहे.
सद्यस्थितीत सिव्हिल हॉस्पिटल मधील रक्त तुटवडा आणि यामुळे रूग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन या रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. रोटरीच्या माध्यमातून सामाजिक योगदान देण्याचा हा एक प्रयत्न आहे. तरी सर्व रक्तदात्यांना रक्तदान करण्याचे आव्हान रोटरी क्लबचे प्रकल्पप्रमुख रो. स्वराज गुजर व रो. रोनीत पवार यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी ८३८०० ७५१५१ ह्या नंबर वर संपर्क करावा.
दरम्यान सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सध्या रक्त तुटवडा निर्माण झाला आहे. रुग्णाची गैरसोय होत आहे, तरी दात्यांनी रक्तदान करावे आणि आपले योगदान द्यावे. आपल्या रक्तदाना मुळे अनेक रुग्णांना जीवनदान मिळेल. सर्व प्रकारे आरोग्याची काळजी घेऊन शिबिराचे आयोजन केले आहे असे आव्हान डॉ. युवराज करपे जिल्हा शल्यचिकित्सक, सातारा यांनी केले आहे.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular