Thursday, June 19, 2025
Homeठळक घडामोडीरोटरी क्लब सातारा कॅम्पचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

रोटरी क्लब सातारा कॅम्पचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

सातारा :- रोटरी क्लब सातारा कॅम्प या सातारा शहरातील सामाजिक कामात अग्रेसर असणाऱ्या संस्थेचा २०२३ – २४ चा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न झाला. आगामी वर्षांमध्ये अध्यक्ष म्हणून रो विजय बाचुलकर सेक्रेटरी रो स्वप्निल वराडकर यांनी पदभार स्वीकारला. मावळचे अध्यक्ष रो मुकेश पटेल आणि सेक्रेटरी रो संदीप जाधव यांनी गतवर्षीच्या कामाचा आढावा घेतला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लातूर येथील उद्योजक सन२०२५-२६ चे नियोजित डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो सुधीर लातूरे उपस्थित होते. रोटरीच्या जगभरातील कार्याबद्दल व आगामी योजनांबद्दल त्यांनी माहिती दिली तसेच सतत आपल्या कार्यात नवनवीन मानदंड निर्माण करणारा क्लब म्हणून सातारा कॅम्प क्लबचे कौतुक केले. सहाय्यक प्रांतपाल रो डॉक्टर सुधीर धुमाळ यांनी प्रांतपाल रो स्वाती हेरकळ यांचा संदेश सर्वांना वाचून दाखवला. नवनिर्वाचित अध्यक्ष रो विजय बाचूलकर यांनी आगामी वर्षात प्रोजेक्ट सृष्टी अंतर्गत 500 फळ झाडे लावणे ,प्रोजेक्ट दृष्टी अंतर्गत ग्रामीण भागातील किमान 50 शाळांमध्ये नेत्र तपासणी व चष्मे वाटप, प्रोजेक्ट साक्षरअंतर्गत ई लर्निंग किट देणे व पाच शाळा लायब्ररी स्थापन करणे ,प्रोजेक्ट स्वच्छ अंतर्गत सातारा शहरात सार्वजनिक ठिकाणी लेडीज टॉयलेट उभारणे, ग्रामीण शाळांमध्ये हँडवॉश युनिट बसवण्याचा निर्धार व्यक्त केला. डॉ. शंकर गोसावी यांचा साह्यक प्रांतपाल पदी नियुक्तीबदल सत्कार व अभिनंदन करण्यात आले.या सोहळ्यामध्ये संचालक रो अनुराधा पंडितराव यांनी नवीन पंधरा मेंबर रोटरी क्लब मध्ये सामील केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी व रो.विनोद दोशी रो अमृता दोशी, क्लब ट्रेनर राहुल गुगळे रो. संदीप बैताडे ,रो निवास पाटील ,रो प्रशांत कणसे यांनी विशेष परिश्रम घेतले. सातारा जिल्ह्यातून पाटण लोणंद कराड उंब्रज शिरवळ येथील क्लबचेही पदाधिकारी, सातारा शहरातील अनेक नागरिक उद्योजक शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. रो. गिता पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सेक्रेटरी रो स्वप्निल वराडकर यांनी सर्वांचे आभार मानले.

Chandrasen Jadhav
Chandrasen Jadhavhttp://GramodhharNews.com
Continuing family legacy of Dainik Gramodhhar Chandrasen Jadhav has been associated with it since last 6 years. He is the Chief Editor & looks after Online News Edition of GramodhharNews.com operated from Satara.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular