(अजित जगताप).
सातारा दि: भारतीय स्वातंत्र्यापूर्वी राष्ट्रीय स्वयं सेवक संघाची स्थापना झाली आहे. संघाच्या मुशीतून अनेक जण तयार झालेले आहेत .परंतु, काँग्रेसने सरकारी कर्मचाऱ्यांनी संघाच्या कार्यक्रमास जावू नये. असा बंदी आदेश काढला होता. नुकताच केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने हा आदेश मागे घेतला आहे. याबाबत साताऱ्यातील संघ परिवारामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. मुळातच आर.एस.एस. जातीयवादी आरोप होत असतानाच काँग्रेसमधील काही दिग्गज नेते मंडळी भाजपमध्ये आल्याने त्यांनी जातीयवादी आरोप हा पुसून टाकला आहे. असे परखड मत संघाशी संबंधित संघ प्रचारक आप्पा कोरे, प्रवीण शहाणे, विकास गोसावी यांनी स्पष्ट केले आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस सरकारने संघाला जातीय वादी समजून ३० नोव्हेंबर १९६६, त्यानंतर २५ जुलै १९७०, आणि २८ ऑक्टोबर१९८० अशा तिन्ही कालावधीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेला बंदी घातली होती. या बंदीमुळे संघाशी संलग्न असणाऱ्या सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना उघडपणाने संघाच्या कार्यक्रमात सहभाग घेता येत नव्हता. तरी ही काही संघप्रेमी यांची कार्यप्रणाली कधीही थांबली नव्हती. अधिक जोमाने संघाचे काम व विस्तार होऊ लागला होता. याला काँग्रेसमधीलच काही दिग्गज मंडळींचाही पाठिंबा होता. आता तर काँग्रेसचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ते नगरसेवक अशी मंडळी भाजप मध्ये दाखल झालेले आहेत. संघ कधीही जातीयवाद करत नाही. हे त्यांना मनापासून पटल्यामुळेच सातारा जिल्ह्यातील खासदार आमदार व नगरसेवक यांच्यासह खेड्यापाड्यातील अनेक कार्यकर्ते संघाच्या विचारधारेवर विश्वास असणाऱ्या भाजपमध्ये सामील झालेले आहेत . असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
ही परिवर्तनाची लाट आहे. १९९६ साली पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळातही संघावर बंदी होती. त्यांना बहुमत नव्हते. आता मात्र महायुतीच्या माध्यमातून भाजप व पूर्वाश्रमीचे काही काँग्रेस व रिपब्लिकन पक्षाचे मित्रपक्ष कार्यकर्ते सध्या एका दिल्याने एका जीवाने संघाच्या विचारधारेवर विश्वास ठेवून कामकाज करत आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या हत्येनंतर फेब्रुवारी १९४८ मध्ये तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी राष्ट्रीय स्वयं संघावर बंदी घातली होती. त्यानंतर संघाच्या चांगल्या आचरणाचे आश्वासानंतर ही बंदी उठवण्यात आली होती.
नागपूर येथील रेशीम बाग येथील राष्ट्रीय स्वयं संघाच्या मुख्यालयामध्ये कधीही तिरंगा फडकवला नाही. ही बाब काँग्रेसचे प्रसिद्धी विभागाचे प्रमुख राष्ट्रीय सरचिटणीस जयराम रमेश यांनी अनेकदा सांगितली आहे. राष्ट्रीय काँग्रेसच्या कालावधीमध्ये तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी रामायण व महाभारत मालिका दूरदर्शनावर दाखवण्यास मंजुरी दिली होती. तेव्हापासून खऱ्या अर्थाने हिंदुत्ववादी वारे भारत देशात वाहू लागले होते. याची आठवण संघाच्या काही कार्यकर्त्यांनी करून दिली आहे. भारत सरकारच्या उपसचिव दर्जाच्या अधिकारी विमल यांनी दिनांक ९ जुलै २०२४ रोजी याबाबत स्पष्ट शब्दात सूचना जारी केलेली आहे. आता सरकारी कार्यालयातही राष्ट्रीय स्वयं संघाच्या कार्यक्रमाला केंद्र सरकारच्या सूचनेनुसार कोणालाही अटकाव करता येणार नाही. अन्यथा त्यांच्यावरती कडक कारवाई होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
सातारा जिल्ह्यातील राष्ट्रीय स्वयं संघाचे अविनाश खर्शीकर , सौ सूनेशा शहा, अश्विनी हुबळीकर, अमोल कांबळे सुनील काळेकर, दत्ताजी थोरात व सौ. कल्पना जाधव यांच्यासह मान्यवरांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. दरम्यान काँग्रेस विचारधारामध्ये सर्व धर्म समभाव मानणाऱ्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या या भूमिकेचा निषेध नोंदवला आहे.
——————————————–
फोटो -सातारा येथे संघ संचलन करताना संघ प्रेमी प्रचाराकांसोबत श्री. छ. खा. उदयनराजे भोसले ( छाया- अजित जगताप, सातारा)
संघ जातीयवादी नसल्याचे काँग्रेसनेच यापूर्वी सिद्ध केले -: आप्पा कोरे
RELATED ARTICLES