सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संस्थापक व माजी अध्यक्ष स्व. रघुनाथराव दौलतराव पाटील उर्फ आर. डी .पाटील यांची पुण्यतिथी बुधवार दिनांक 19 जून रोजी बँकेचे मुख्य कार्यालय, नवीन प्रशासकीय इमारत, सातारा येथे संपन्न झाली .
यावेळी बँकेचे उपाध्यक्ष श्री . सुनिल माने म्हणाले स्व .रघुनाथराव पाटील यांचे व्यक्तीमत्व निस्वार्थी आणि निष्कलंक होते .सन 1947-48 मध्ये कराड तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष,जिल्हा बँकेचे सतत 17 वर्षे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष व उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे उपाध्यक्ष व संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी दूध संघ लि .पुणेचे अध्यक्ष,कोयना सह .दूध प्रकल्पांचे अध्यक्षपद अशी रघुनाथराव पाटील यांची यशस्वी कारकीर्द आहे .स्व .रघुनाथराव पाटील यांचे सातारा जिल्हा बँकेच्या उभारणी आणि प्रगतीमध्ये अत्यंत मोलाचे योगदान आहे .स्व .रघुनाथराव पाटील यांचे कार्य सहकार क्षेत्रांमध्ये कार्य करणा-या सर्वांना प्रेरणादायी आहे. सहकारी बँकिग क्षेत्रात स्व. रघुनाथराव पाटील यांचे काम दीपस्तंभा सारखे आहे.
भारत देशात इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रात मोठया प्रमाणांत सहकाराची व्याप्ती झालेली आहे . सातारा जिल्हा बँक सहकारातील दीपस्तंभ असून सद्या सहकारापुढे अनेक अडी-अडचणी, तीव्र स्पर्धेला सामोरे जावून सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे .बँकेने जिल्हयातील शेतक-यांसाठी वेळोवेळी विविध प्रकारच्या कर्ज योजना कार्यान्वित केलेल्या आहेत . त्यांची परिणामकारक अंमलबजावणी अंतिम घटकांपर्यंत यशस्वीपणे झालेचे दिसून येते . तव्दतच जिल्हयातील शेतकरी सभासदांना दुष्काळ, अतिवृष्टी, जनावरांची छावणी, अन्य अडचणीच्या काळांत बँकेने सर्वतोपरी मदत केलेली असून त्याचा फायदा शेतकरी सभासदांना झालेला आहे . यातूनच चांगली सहकारी चळवळ या जिल्हयात रूजली आहे .
बँकेचे सरव्यवस्थापक श्री .एम .व्ही .जाधव, सरव्यवस्थापक श्री .राजीव गाढवे व्यवस्थापक श्री .सुजित शेख,श्री .राजेंद्र भिलारे श्री .शामराव गायकवाड तसेच विविध विभागांचे उपव्यवस्थापक, विभागप्रमुख, अधिकारी व सेवक यांनी स्व .रघुनाथराव दौलतराव पाटील यांचे प्रतिमेस फुले वाहून विनम्र अभिवादन केले.
सहकाराने सर्वसामान्यांचे आर्थिक विकासास चालना मिळाली!: श्री. सुनिल माने
RELATED ARTICLES