पाटण दि. २८ स्वातंत्र्य सैनिक स्व. बाळासाहेब उर्फ भडकबाबा पाटणकर यांचे पुण्यतिथीनिमित्त प्रतीवर्षाप्रमाणे या वर्षीही दोन व तीन फेब्रुवारी रोजी साहित्य संमेलन व ग्रंथ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनानिमित्त पाटण येथे निमंत्रण पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. या साहित्य संमेलनात प्रख्यात लेखक,कवी,कथाकार, कलाकार, साहित्यिक अभ्यासक यांची रेलचेल अनुभवायला मिळणार असून या ग्रंथ महोत्सव आणि साहित्य संमेलनात भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे संमेलनाचे कार्याध्यक्ष व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांनी साहित्य संमेलन संयोजन समितीच्या बैठकीत सांगितले.
या ग्रंथ महोत्सव आणि साहित्य संमेलना संदर्भात पाटण येथील कै.श्रीमंत नागोजीराव पाटणकर वाचनालयात संयोजन समितीची बैठक झाली.यावेळी निमंत्रण पत्रिकेचे प्रकाशन करताना विक्रमबाबा पाटणकर म्हणाले शुक्रवार दि. २ फेब्रुवारी या पहिल्या दिवशी सकाळी ८.३० वा. नगरपंचायत पाटण येथुन ग्रंथ दिंडी चे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथ दिंडीत साहित्य प्रेमी, रसिक, विविध शाळांचे विद्यार्थी त्यांचे चित्ररथ, शिक्षक, पालक, नागरीक यांचा सहभाग राहणार आहे. सकाळी ११ वा. साहित्य संमेलनाचे उद्घाटन होईल. यावेळी संमेलनाध्यक्ष जेष्ठ कवी, लेखक प्रा.वैजनाथ महाजन, उद्घाटक आ. शंभुराज देसाई, प्रमुख अतिथी आ. नरेंद्र पाटील, प्रमुख उपस्थिती हिंदूराव पाटील, विक्रम पावसकर, स्वागताध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांची उपस्थिती असणार आहे. दुपारच्या सत्रात राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त जेष्ठ लोकनाट्य कलावंत श्रीमती मंगला बनसोडे यांची प्रकट मुलाखत आणि भव्य सत्कार मुलाखतकार अरुण खांडके यांच्या उपस्थितीत. दुपारी ४ वा. कवी संमेलन प्रमुख पाहुणे कवी अरुण म्हात्रे, सहभाग- परिसरातील मान्यवर कवी-कवयित्री, सुत्र संचालन प्रा.सौ.विजयमाला म्हासुर्णेकर, सायंकाळी ७ वा. सुगम संगीताचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.
दुसऱ्या दिवशी शनिवार दि. ३ फेब्रुवारी सकाळी १०.३० वा. स्मृती व्याख्यान स्वातंत्र्य सैनिक कै. भाई बाळासो पाटणकर यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांच्या जीवनकार्याचा परिचय करून देणारे भाषण. सहभाग सयाजीराव पाटील कराड, नीलकंठ शिवाचार्य महाराज मठाधिपती धारेश्वर संस्थान दिवशी. प्रचार्य श्री ए. वाय. मुल्ला. सकाळी ११.३० वा. डॉ. सागर देशपांडे मृत्युंजय प्रतिष्ठान पुणे यांचे ‘मृत्युंजय’ कांदबरी वर कुळकथा, आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार परिषद मुंबई. यांचे कडून आदर्श पत्रकार संघ पुरस्कार पाटण तालुका पत्रकार संघास मिळाल्या बद्दल पत्रकार संघाचा सत्कार. दुपारी १.३० वा. कथाकथन सहभाग प्रा. विजय जाधव मिरज. दुपारी ३ वा. समारोप सहभाग श्रीमंत राजमाता कल्पनाराजे भोसले. विजय कुवळेकर जेष्ठ साहित्यिक पुणे. सत्यजितसिंह पाटणकर, डॉ. अतुलबाबा भोसले. प्रा. रविंद्र सोनावले, गोरख नारकर.
या साहित्य संमेलन ठिकाणी ग्रंथ प्रदर्शन विक्री, विविध पुस्तके साहित्य यांचे वीक्री केंद्र उभारण्यात येणार आहेत. या साहित्य संमेलनाचा विद्यार्थी-पालक, नागरीक यांनी लाभ घ्यावा असे आवाहन साहित्य संमेलनाचे प्रमुख संयोजक विक्रमबाबा पाटणकर यांनी केले आहे. या बैठकीला जेष्ठ पत्रकार ए. व्ही. देशपांडे, अरुण खांडके, बाळासाहेब पवार, अशोकराव देवकांत, शंकराव मोहिते, दादासाहेब कदम, संपतराव देसाई, राजेंद्र कांबळे, विजय ताटे, सुरेश संकपाळ, सचिन जाधव, बाबासो सुतार, विजय गायकवाड, अमित बेडके, अतुल प्रभाळे, प्रा. सौ. विजयमाला म्हासुर्णेकर, डाॅ. सौ. अर्चना देशमुख, डॉ. सौ.विद्या पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.